Pune | पुण्यात ‘जी-20 ‘ परिषदेची एक बैठक, 20 देशांचे प्रतिनिधी होणार सहभागी ; केंद्रीय पथकाने केली पाहणी

शहरात आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत या परिषदेच्या नियोजन विषयक चर्चा केली आहे.

Pune | पुण्यात 'जी-20 ' परिषदेची एक बैठक, 20  देशांचे प्रतिनिधी होणार सहभागी ; केंद्रीय पथकाने केली पाहणी
जी-20 परिषदेची बैठक होणार पुण्यात Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 11:31 AM

पुणे – यंदाच्या ‘जी-20 ’ परिषदेचे (G-20 Council)यजमानपद भारताने स्वीकारले आहे. येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या या परिषदेची एक बैठक पुण्यात होणार आहे. यावेळी या परिषदेसाठी आलेले पाहुणे पुण्याला भेट देणारा असून या भेटीमध्ये पुण्यातील (Pune)इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृतीविषयी जाणून घेणार आहेत . या अनुषंगाने केंद्रीय पथकाने नुकतीच पुण्यातील बैठकीच्या ठिकाणची पाहणी केली आहे. या पाहणीत मंत्र्यांसाठी राहण्याची व्यवस्था, त्यांची वाहन, सुरक्षा व्यवस्था तसेच संभाव्य कार्यक्रमांची चाचपणी करण्यात आली आहे. डिसेंबर , 2022 पासून सुरू होणाऱ्या या ‘जी-20 ’ परिषदेच्या विविध बैठका पैकी, महाराष्ट्र राज्यात मुंबई (Mumbai) व पुणे येथे प्रत्येकी एक बैठक घेतली जाणार आहे.

पुण्याची संस्कृती जाणून घेणार

पुण्यात ‘जी-20 ’ परिषदेच्या निमित्ताने 20  देशांतील 300  मंत्री दाखल होणार आहेत. पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घेणार आहेत. शहरात आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत या परिषदेच्या नियोजन विषयक चर्चा केली आहे. यात आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था करण्यासाठी व्ही व्हीआयपी गाड्या यांची व्यवस्था करण्याबाबत स्थानिक यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे.

शहराच्या लौकिकात  भर पडणार

‘भारताला 2022  साली स्वातंत्र्य मिळून 75  वर्षं पूर्ण होणार आहेत. भारत देश जगात सगळ्यांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून येथे येऊन भारताचा समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घ्या आणि भारताच्या पाहुणचाराचाही आस्वाद घ्या,’ असे मोदींनी ट्विटद्वारे आवाहन केले होते.  येत्या डिसेंबर 2o22 पासून ही परिषद होणार असली तरी याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आल्याने शहराच्या लौकिकातआणखी भर पडणार आहे.

आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, Kashmir Files वरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

गिरोली घाट परिसरात गव्याच्या कळपाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gadchiroli : ठसका उठण्यापूर्वीच मिरची पिकाला रोगराईने घेरले, कृषितज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला?

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.