Pune crime : ‘ते चोर आहेत, खूनही करू शकतात’; खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्याला धमकावत लुटलं, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा थरार

दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यांची कार्यपद्धती सारखीच होती. वाकडजवळील कात्रज-देहू रोड बायपासवर लिफ्ट देण्यासाठी त्यांनी एकच पांढरी एसयूव्ही वापरली, असे पोलिसांनी सांगितले.

Pune crime : 'ते चोर आहेत, खूनही करू शकतात'; खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्याला धमकावत लुटलं, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा थरार
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 3:52 PM

पुणे : कारमध्ये लिफ्ट घेणाऱ्या खोपोली येथील सॉफ्टवेअर इंजिनीअरला धमकावून, लुटून(Rob), पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील तळेगाव दाभाडेजवळ एका ठिकाणी सोडून दिल्याच्या अवघ्या तीन दिवसांनंतर, आणखी एका व्यक्तीला अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोप एकच असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 27 मे रोजी, राजगड जिल्ह्यातील खोपोली येथील तांत्रिकाने भूमकर चौकात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV)मधील दोन व्यक्तींनी लिफ्ट घेत नंतर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटल्या होत्या. ताज्या घटनेत 30 मे रोजी भोसरीतील एका पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला अशाचप्रकारे लुटण्यात आले होते. याविषयी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Crime branch) एका अधिकाऱ्याने सांगितले, की दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यांची कार्यपद्धती सारखीच होती. वाकडजवळील कात्रज-देहू रोड बायपासवर लिफ्ट देण्यासाठी त्यांनी एकच पांढरी एसयूव्ही वापरली.

वाकडहून घेतली लिफ्ट

शिरगाव पोलीस चौकीत तक्रार दाखल करणाऱ्या व्यावसायिकाने (32) सांगितले, की 30 मे रोजी ते वाकडला होते. त्यांना ठाण्यातील त्यांच्या बहिणीला भेटायचे होते. त्यासाठी ते वाहनाची वाट पाहत होतो, तेव्हा दुपारी दीडच्या सुमारास पांढऱ्या रंगाची SUV जवळ थांबली. ड्रायव्हरच्या शेजारी एक माणूस होता. त्याने कुठे जायचे आहे, असे विचारले. मी ठाण्याला म्हणालो. तो म्हणाला की तो पालघरला जात आहे, पण शक्य झाले तर मला नवी मुंबईतील जुईनगर येथे सोडा. त्याने 100 रुपये मागितले.

‘पिन उघड करण्यास भाग पाडले’

व्यावसायिकाने सांगितले, “जेव्हा एक्स्प्रेसवेवर एसयूव्ही धावू लागली, तेव्हा ड्रायव्हरने माझा सेलफोन मागितला कारण त्याला कॉल करायचा होता. त्याने अचानक कोणालातरी कॉल केला, मला विचारले की मी किती रोकड घेऊन जात आहे. नंतर त्यांनी मला सांगितले. ते पुढे म्हणाले, की ड्रायव्हरने सांगितले की ते चोर आहेत आणि ते माझा खून करू शकतात. माझ्याकडे 1,000 रुपये होते, जे मी त्यांना दिले. त्यांनी माझे डेबिट कार्ड हिसकावले आणि मला पिन उघड करण्यास भाग पाडले.

हे सुद्धा वाचा

उर्से टोल प्लाझाजवळ सोडले

तक्रारदाराने त्यांचा स्मार्टफोन परत करण्याची विनंती केली असता, ड्रायव्हरने फोन परत मिळवण्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. ड्रायव्हरने सिमकार्ड काढून मला दिले. त्याने उर्से टोल प्लाझाच्या काही किलोमीटर आधी एसयूव्ही थांबवली आणि मला तिथे सोडून दिले, असे त्यांनी सांगितले. ते निघून गेल्यानंतर भोसरी येथील रहिवासी दुसऱ्या कारमध्ये लिफ्ट घेऊन लगेचच शिरगाव पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले, की पीडित व्यक्तींच्या तक्रार दाखल करेपर्यंत गुन्हेगारांनी डेबिट कार्ड वापरले नव्हते. पीडित व्यक्तीने आम्हाला सांगितले, की त्याच्या बँक खात्यात कोणतीही शिल्लक नाही. तो त्याचे डेबिट कार्ड ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करणार होता, परंतु आम्ही त्याला थांबण्याची विनंती केली कारण हे दोघे कोठूनही पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकतात आणि आम्ही त्यांचा शोध घेऊ शकतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.