हलगीचा कडकडाट आणि फटाक्यांची आतषबाजी, कोरोनावर मात केलेल्या कुटुंबाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

सगळ्या कुटुंबाने कोरोनावर मात केल्याचा गावकऱ्यांना इतका आनंद झाला की गावकऱ्यांनी हलगीच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कोरोनामुक्त कुटुंबाचं स्वागत केलं.

हलगीचा कडकडाट आणि फटाक्यांची आतषबाजी, कोरोनावर मात केलेल्या कुटुंबाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 8:56 PM

इंदापूर (पुणे) :  कोरोनावर मात केलेल्या इंदापुरातील एका कुटुंबाचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलंय. सगळ्या कुटुंबाने कोरोनावर मात केल्याचा गावकऱ्यांना इतका आनंद झाला की गावकऱ्यांनी हलगीच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कोरोनामुक्त कुटुंबाचं स्वागत केलं. (A warm welcome from the villagers to the family who Defeat Corona in Indapur)

इंदापूर शहरानजीक असणाऱ्या म्हेत्रेवस्तीतील बाळासाहेब म्हेत्रे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जणांना पंधरवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. म्हेत्रे यांचे 85 वर्षे वयाचे, तर आई 81 वर्षे वयाचे… त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने कुटुंबाची काळजी वाढली होती.

म्हेत्रे कुटुंबातील सर्व सदस्यांवर शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार आणि उपचारानुसार म्हेत्रे कुटुंबातील वयोवृद्ध आईवडिलांनी तसंच कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनी कोरोनावर यशस्वीपण मात केली.

वयोवृध्द दांपत्यासह एकाच कुटुंबातील सहा जणांनी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वीरित्या मात करुन आत्मबलाच्या जोरावर जीवावरच्या संकटावर देखील मात करता येते, याचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. या संकटातून त्यांची सुटका झाल्याबद्दल ग्रामस्थांनी म्हेत्रे  कुटुंबाला तोफांची सलामी देत सवाद्य शोभायात्रा काढून त्यांचं स्वागत केले.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

हलगीच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली मिरवणूक कोणा एका लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळींची नव्हती तर ती होती कोरोनावरती मात करून आलेल्या कुटुंबाची… गावकऱ्यांनी केलेलं स्वागत बघून म्हेत्रे कुटुंब देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. एका जीवघेण्या आजारातून आम्ही सगळे वाचलो. गावकऱ्यांनीही आमचं सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं. आमचं मन भरुन आलं, अशा भावना यावेळी कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केल्या. (A warm welcome from the villagers to the family who Defeat Corona in Indapur)

हे ही वाचा

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींसाठी भाजप नेते राम कदमांचा फोन

या फोटोची चर्चा मुंबईत का आहे? मुख्यमंत्र्यांकडून मान की..वाचा सविस्तर प्रकरण

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.