Pune crime : जुन्या भांडणातून महिलेच्या डोक्यात हत्यारानं वार, पुण्याच्या मौजे जांबमधली घटना; खून करून बांधावर फेकून दिला मृतदेह

पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune crime : जुन्या भांडणातून महिलेच्या डोक्यात हत्यारानं वार, पुण्याच्या मौजे जांबमधली घटना; खून करून बांधावर फेकून दिला मृतदेह
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 9:55 AM

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला डोक्यात हत्याराचे वार (Stabbing her head with a weapon) करून खून केल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे हा प्रकार घडला. मृत महिलेचा मृतदेह ऊस आणि बाजरी पिकाच्या बांधावर आढळून आला. याप्रकरणी एका व्यक्तीवर वालचंद नगर पोलीस ठाण्यात (Walchand Nagar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता पांडुरंग वाघमारे (वय 45, रा. वडजल, ता. माण, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळू साठे (रा. जांब, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांनी फिर्याद (Filed a case) दिली आहे.

जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्टच्या रात्री दहाच्या दरम्यान संगीता वाघमारे तसेच महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात वाद झाला होता. यावेळी संगीता यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली होती. या भांडणाच्या कारणावरून गायकवाड याचा नातेवाईक अक्षय साठे याने संगीता यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले. या हल्ल्यामध्ये संगीता गंभीर जखमी झाल्या. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने अखेर संगीता यांचा मृत्यू झाला. आरोपींनी अत्यंत निर्दयी पद्धतीने संगीता यांचा खून करून त्यांचा मृतदेह तेथील ऊस आणि बाजरीच्या पिकाच्या बांधावर टाकून दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

निर्दयी पद्धतीने संगीता यांचा खून

पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद आणि त्यानंतर खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वीच भोसरीत एका महिलेच्या गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील आरोपींचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.