मोबाईलने जीव घेतला! पाचव्या मजल्यावर असताना फोन आला, तिने तो रिसिव्ह केला पण…

वडिलांच्या नवीन प्रोजेक्टच्या बांधकामाची पाहणी करायला तरुणी कुटुंबासोबत आली होती. पाहणी करत पाचव्या मजल्यावर सर्वजण गेले. पण तितक्यात तरुणीला एक फोन आला आणि होत्याचं नव्हतं झालं.

मोबाईलने जीव घेतला! पाचव्या मजल्यावर असताना फोन आला, तिने तो रिसिव्ह केला पण...
फोन उचलण्याच्या नादात तरुणी पाचव्या मजल्यावरुन पडलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:38 AM

पुणे / अभिजीत पोते : नवीन इमारतीची पाहणी करायला गेलेल्या तरुणीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. इमारतीची पाहणी करत असताना तरुणीला फोन आला. तरुणी फोन घेण्याच्या नादात गडबडीत पाचव्या मजल्यावरुन उतरताना तोल गेला आणि ती खाली पडली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुण्यातील सासवड येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडले नेमके?

पुण्यातील सासवड परिसरात सुनील जगताप या बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन प्रोजेक्टचे काम सुरु आहे. जगताप यांच्या नवीन आठ मजली इमारतीचे काम सुरु आहे. जगताप कुटुंबीय 2 एप्रिल रोजी आपल्या नवीन बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

पाहणी करत सर्वजम पाचव्या मजल्यावर पोहचले. पाचव्या मजल्यावर पाहणी करत असतानाच जगताप यांची 21 वर्षाची मुलगी अनुष्का हिला फोन आला. फोन घेण्याच्या नादात पाचव्या मजल्यावरुन उतरताना तोल गेला आणि अनुष्का पाचव्या मजल्यावरुन थेट खाली कोसळली.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

या अपघातात गंभीर जखमी अनुष्काला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अखेर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तरुण मुलीच्या मृत्यूमुळे जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.