Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला,अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची देतात पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Accident: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू
अपघात Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 9:46 AM

पुणे, पुणे – सातारा महामार्गावर (Pune Satara Highway) कापूरहोळ जवळ जड वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला मोठा अपघात झाला आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेला जात असताना मागून येत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रेलरवर धडकला. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे (One Died in Accident). काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला,अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची देतात पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने ट्रक चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्या आधिच त्याचा मृत्यू झाला.

जड वाहतूक करणारा MH14HG7633 हा ट्रेलर शनिवारी रात्री माल घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाला होता, पुणे – सातारा महामार्गावरचा कापूरहोळचा ब्रिज उतरत असताना त्याला अचानक मागून येणाऱ्या DD03P9917  ट्रकची  जोरदार धडक बसली, धडक एवढी भीषण होती की यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.पावसामुळं रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटले असा प्राथमिक अंदाज आहे. यासंबधीचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

15 दिवसातला हा चौथा अपघात

गेल्या काही दिवसांपासून या मार्गात अपघातांची मालिका सुरु असून मागच्या 15 दिवसातला हा चौथा अपघात आहे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रिलायंसचे अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलायं.  जड वाहतूक करणारा MH14HG7633 हा ट्रेलर शनिवारी रात्री माल घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाला होता, पुणे – सातारा महामार्गावरचा कापूरहोळचा ब्रिज उतरत असताना मागून येणाऱ्या ट्रक ने जबरदस्त धडक दिल्याने हा अपघात झाला.

NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.
नाव न घेत अमोल मिटकरींचा ट्विट भिडे गुरुजींना खोचक टोला
नाव न घेत अमोल मिटकरींचा ट्विट भिडे गुरुजींना खोचक टोला.
त्यांची युती होईल तेव्हा बोलू; शिंदे-ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला
त्यांची युती होईल तेव्हा बोलू; शिंदे-ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला.
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत.
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप.
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?.
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान.
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....