महावितरणाचा झटका ; पुणे जिल्हा परिषदेच्या 800 शाळा अंधारात , बिल न भरल्याने केली कारवाई
जिल्ह्या परिषदेकडे या शाळांचे वीज भरण्यासाठी निधी उपलब्ध नाही असे कारण जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यानंतर वीज महावितरण विभागाने ही कारवाई केली आहे.
पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या 800 शाळांतील वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा धक्क्कादायक प्रकार समोर आला आहे . यामध्ये तब्बल 792 शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे तर 128 शाळांमधील विजेचा मीटर काढून टाकण्यात आला आहे . वीज महावितरण विभागाने ही कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत, त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरु आहे.
जिल्हा परिषदेकडे निधी नाही धक्कादायकबाब म्हणजे जिल्ह्या परिषदेकडे या शाळांचे वीज भरण्यासाठी निधी उपलब्ध नाही असे कारण जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यानंतर वीज महावितरण विभागाने ही कारवाई केली आहे.
खा. सुप्रिया सुळेंच्या मतदार संघातील ४३७ शाळांचा समावेश महावितरणाने कारवाई केलेल्या या 800 शाळांपैकी 437 शाळा ह्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातील असल्याचे समोर आलं आहे. इंदापूर 194 , शिरूर 146 , मुळाशी 50, भोर -74 , दौंड- 52 , खेड -46, वेल्हा 32, आंबेगाव- 34, बारामती -35, हवेली – 13, जुन्नर -41 शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वाढीव वीज बिल कोरोनाच्या कालावधीत लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास दोन वर्षांच्या कालावधीत सर्वच शाळा बंद होत्या. त्यादरम्यान अनेक ठिकाणी वाढीव वीज बिल आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र वाढीव वीज बिल आल्याने जिल्हा परिषदेने वीज बिलाचा भरणा केला नाही. तर वीज बिल न भरल्याने धडक कारवाई करत महावितरणाने वीजपुरवठा खंडित केला आहे. कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच शाळा सुरु होत आहेत. अशा स्थितीत शाळांमध्ये वीजच नसेल तर विद्यार्थ्यांचे विजेवर अवलंबून असणारे संगणकाचा सराव , प्रयोग शाळेतील प्रयोग कश्याप्रकारे चालणार याबाबत मोठा संभ्रम शिक्षक व पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.
हेही वाचा
दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार ‘मोफत कोचिंग सेंटर’
‘चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले’, भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यावर उखडले