आदित्य ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल, राम कदमांची शिवसेनेवर टीका
आदित्य ठाकरेंनी जी सभा घेतली ती खोटं बोलण्याची सभा होती.
पुणे : आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन का गेली, हे जनतेला सांगण्यासाठी सभा घेतली होती. त्याच ठिकाणी म्हणजे मावळ-वडगाव येथे भाजपनं आज वेदांता कंपनीबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सभा घेतली. यावेळी बोलताना राम कदम म्हणाले, शंभर कोटींची तुमच्या महाविकास आघाडी सरकारची वसुली देशानं पाहिली. असं कोणतं मोठं कमिशन तुम्ही या कंपनीला मागितलं होत का. या गोष्टीचा खुलासा करावा लागेल. कंपनी येण्याचं स्वतः ठरविते. ती रातोरात कशी निघून जाते. सत्य देशापुढं प्रशासनाला सांगावं लागेल. महाराष्ट्राच्या युवकांपुढं मांडावं लागेल, असंही राम कदम म्हणाले.
आदित्य ठाकरेंची खोटं बोलण्याची सभा
आदित्य ठाकरेंनी जी सभा घेतली ती खोटं बोलण्याची सभा होती. आता खरं काय ते महाराष्ट्राला या सभेतून कळेल. त्यांना स्वतःचे आमदार सांभाळता येत नाही. जगाच्या पाठीवर असं कधी घडलं का की, मंत्री मुख्यमंत्र्यांना सोडून जातात. मुख्यमंत्र्यांच्या कानोकान खबर नाही.
महाविकास आघाडी सरकार हे फुकट्या पायाचं सरकार होतं. सरकार आलं तेव्हाचं एकही चांगला दिवस गेला नाही. कोरोनाच्या कालखंडात लोकं तडफडून मेली. या सरकारचे मुख्यमंत्री घराच्या बाहेरदेखील पडत नव्हते. मंत्रालयात मुख्यमंत्री अडीच वर्षात फक्त पाचवेळा गेले.त्यातील तीन वेळा लॉबीतून परतले, याची आठवण राम कदम यांनी करून दिली.
वेदांकाकडं वसुली कुणी मागितली?
आदित्य ठाकरेंनी ज्या मावळ-वडगावमध्ये सभा घेऊन वेदांता फॉक्सकॉनबद्दल खोटं सांगितलं. त्याच जागेवर आम्ही आंदोलन करत आहोत. नेमकं काय खरं आहे. नेमकं कमिशन कुणी मागितलं. वेदांता फॉक्सकॉनकडं वसुली कुणी मागितली. याचा पर्दापाश याठिकाणी करत असल्याचंही राम कदम म्हणाले.
पतंप्रधान मोदी यांनी काही योजना जाहीर केल्या. अनुदान जाहीर केली. त्यामुळं कंपनीनं प्लांट लावायचं ठरविलं. तळेगाव, चाकण, हिंजेवाडी येते जागा पाहिली. तळेगावची जागा फायनल केली. तत्कालीन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट होते. त्यानंतर कंपनी निघून जाते, याचा अर्थ महाविकास आघाडीमुळं वेदांता निघून गेल्याचा आरोपही राम कदम यांनी केला.