या जिल्ह्यातील वन विभागासाठी आनंदाची बातमी, 50 वर्षानंतर अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन दाखल
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 50 वर्षानंतर मावळ वन विभागात अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन दाखल झाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी आनंदी आहेत. अनेक दिवसांपासून त्यांनी मागणी केली होती. रेस्क्यू व्हॅनचा फायदा तुम्हाला माहित आहे का ?
मावळ : पुणे जिल्ह्यातील (pune news) मावळमध्ये (maval news) अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाल्याने बिबट्यासह अनेक वन्यप्राणी नागरी वस्तीत फिरताना दिसतात. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगत होते. मावळ मधील अनेक भागात आता बिबट्या देखील दिसू लागला आहे. मात्र या बिबट्यांना रेस्क्यू करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बिबट्या प्रमाणेच इतर अनेक प्राण्यांना देखील रेस्क्यू करणे अशक्य असायचे किंवा चारचाकी वाहनातून उपचारासाठी घेऊन जावे लागत असे. या दरम्यान अनेकदा या वन्य प्राण्यांचा मृत्यू (Maharashtra Animal News) देखील झाला आहे.
वनविभागात अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन दाखल
तब्बल 50 वर्षानंतर मावळच्या वनविभागात अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन दाखल झाली आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये (rescue van) रेस्क्यूसाठी लागणारे सर्व साहित्य तसेच स्वयंचलित पिंजरा आशा सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता मावळच्या कोणत्याही भागात वन्य जीवांना रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवणे सोपे जाणार आहे. इतक्या वर्षाची मागणी पुर्ण झाल्याने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अधिक आनंदी झाले आहेत.
मावळ भागात प्राण्यांची दहशत
मावळ भागात जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिथं दिवसाढवळ्या प्राणी दिसत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जाणं बंद केलं आहे. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर एखाद्या प्राण्याला ताब्यात घेणं अधिक अवघड व्हायचं, त्याचबरोबर एखाद्या प्राण्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा वाटेत मृत्यू देखील झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन मिळावी अशी वनविभागाची इच्छा होती.