“अजितदादांवर बोलण्याची त्याची लायकी नाही” ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं गोपीचंद पडळकर यांची थेट लायकीच काढली
अजित पवार यांच्यावरही बोलण्याची त्याची लायकी नाही त्यामूळे लायकी नसणाऱ्या माणसांबद्दल मी बोलणारच नाही अशा शब्दात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे : गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्यावर टीका हे समीकरण जुळलेलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून गोपीचंद पडळकर शरद पवार आणि शिवसेना अशा दोन्ही गोष्टींवर टीका करतात. आताही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही त्यांच्यावर पलटवार करत गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना कीड म्हटल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
शाब्दिक युद्ध
गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी त्यांची थेट लायकीच काढली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर हे शाब्दिक युद्ध रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
पडळकरची पात्रता नाही
शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी टीका केल्यानंतर त्यांनी थेट त्यांची लायकी काढली आहे. आमदार निलेश लंके यांना त्यांच्या टीकेबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले आहे की, त्याच्याबद्दल मी बोलणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटली आहे. त्याच्याविषयी मी बोलणार नाही कारण त्याची तितकी पात्रताही नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
बोलण्याची त्याची लायकी नाही
अजित पवार यांच्यावरही बोलण्याची त्याची लायकी नाही त्यामूळे लायकी नसणाऱ्या माणसांबद्दल मी बोलणारच नाही अशा शब्दात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जात असते. त्यामुळे त्यांनी गोपीचंद पडळकर याने टेंडर घेतलं आहे त्यामूळे तो असच भुकत असतो अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.