तिच्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्याची देशासोबत गद्दारी? प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी बातमी

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणात आज मोठी बातमी समोर आली आहे. कुरुलकर यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या एक दिवसाच्या कोठडीची मागणी करण्यात आली. ही मागणी कोर्टाने मान्य केली. यावेळी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली.

तिच्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्याची देशासोबत गद्दारी? प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी बातमी
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 6:19 PM

पुणे : डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर प्रकरणी आता मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. हवाई दलाचा एक अधिकारीदेखील हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या वायुसेनेचे गुप्तचर पथक शेंडे नावाच्या अधिकाऱ्याची चौकशी करत आहे. गरज पडल्यास पुणे एटीएसदेखील या प्रकरणी चौकशी करण्याची शक्यता आहे. प्रदीप कुरुलकर यांना आज त्यांची कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी पार पडली आणि कुरुलकर यांच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली. कोर्टात सुनावणी सुरु असताना या विषयी महत्त्वाची माहिती समोर आली.

या हनीट्रॅप प्रकरणात आणखी एक बडा अधिकारी अडकल्याची माहिती समोर आलीय. संबंधित अधिकारी हा हवाई दलाचा आहे, अशी माहिती मिळत आहे. संबंधित अधिकाऱ्याचं निखिल शेंडे असं नाव आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना एकाच आयपी अॅड्रेसवरुन मेसेजेस आले होते. या दोघांमध्ये काही संभाषण देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने आता तपास देखील सुरु आहे. तपासासाठी हवाई दलाची एक टीमही तयार करण्यात आली आहे, अशी माहिती आता समोर आलीय.

एटीएसच्या अधिकाऱ्यांची कोर्टात महत्त्वाची माहिती

कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. प्रदीप कुरुलकर यांच्याकडून one plus 6T हा मोबाईल मिळाला. हा मोबाईल आम्ही फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. पण तो डीकोड झाला नाही. तो एटीएसकडे पाठवण्यात आला. त्यानंतर पुन्हा प्रदीप कुरुलकर यांच्यासमोर डीकोड करण्यात आला. मोबाईलमध्ये जे स्क्रिनशॉट काढण्यात आले होते त्यामध्ये एक लिहिलं होतं की, प्रदीप तू मला ब्लॉक का केलं आहेस? त्यामुळे हवाई दलाच्या निखिल शेंडे नावाच्या अधिकाऱ्याचं देखील या हनीट्रॅप प्रकरणात नाव असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

निखिल शेंडे यांचा तपास सुरु

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हवाईदल अधिकारी निखिल शेंडे यांच्याशीही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने संपर्क साधल्याची अतिरिक्त माहिती समोर येतेय. कुरुलकर यांना निखिल शेंडे यांचा मेसेज आला होता. मला का ब्लॉक केलेस? असा मेसेज शेंडे यांनी कुरुलकर यांना पाठवला होता.

एटीएसच्या पथकाने हवाई दलाचे अधिकारी निखिल शेंडे यांच्याकडे चौकशी केली असता शेंडेही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरण गंभीर असल्याने भारतीय वायुसेनेचे गुप्तचर पथक निखिल शेंडेची चौकशी करत आहे.

दरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, 1 दिवसाच्या कोठडीची आवश्यकता नाही कारण एटीएसने फॉरेन्सिक टीमकडून घेतलेला विशिष्ट मोबाईल आवश्यक नाही. कारण माहिती आधीच एटीएसकडे आहे, फॉरेन्सिक टीमने त्यांना दिलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणात नेमक्या काय हालचाली होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.