गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर

| Updated on: Feb 27, 2021 | 7:48 AM

गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली आहे.

गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर
पोलीस
Follow us on

पुणे : नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटल्यानंतर गजा मारणे याने मुंबई पुणे एक्स्सप्रेस वेवर मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. आता गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली आहे. (After Gaja marne Gang, Ghaywal Gang On Pune Police Radar)

चॉपरचा धाक दाखवून रॅलीसाठी जबरदस्तीने जीप घेऊन जाणाऱ्या घायवळ टोळीतील 8 जणांवर गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीविरोधी दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय तर दोघांना अटक केलीय.

संतोष आनंद धुमाळ (वय 38, रा. भूगाव, ता. मुळशी) आणि मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय 29, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका गॅरेज व्यावसायिकाने याबाबत माहिती दिलीय.

तक्रार करणारी व्यक्ती गॅरेजमध्ये काम करत होती. त्यावेळी निलेश घायवळ टोळीतील संतोष धुमाळच्या सांगण्यावरुन कुणाल कंधारे, मुसाबा शेख, अक्षय गोगावले, व इतर चार अशा आठ जणांनी चॉपरचा धाक धाकवून त्यांची जीप चोरुन नेली.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गजा मारणे कारागृहातून बाहेर, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर काय घडलं?

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

ती लँडक्रुझर कार जप्त

गजा मारणे ज्या गाडीत बसून तळोजा कारागृहातून बाहेर पडला ती लँडक्रुझर कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची होती. या गाडीची सध्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांकडेच ही कार आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीनंतर आता ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे लँडक्रुझर कार गुंडाला देणे नारायण गलांडे यांना भलतेच महागात पडले.

(After Gaja marne Gang, Ghaywal Gang On Pune Police Radar)

हे ही वाचा :

गजा मारणेच्या ताफ्यातील 300 गाड्यांनी टोल बुडवला; खंडणीचा गुन्हा दाखल होणार

इचलकरंजीत डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, गाडीची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण

महाविद्यालयीन तरुणाकडून मैत्रिणीची हत्या, एकतर्फी प्रेमातून संपवलं