महाराष्ट्रात भाजपचा विस्तार गिरीश बापट यांच्यामुळेच…; नितिन गडकरी यांनी 45 वर्षापूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा
गिरीश बापट यांनी ज्या प्रमाणे मोठ्या नेत्यांबरोबर संबंध ठेवले त्याचप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांबरोबरही त्यांनी संबंध ठेवले होते.
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार, खासदार, माजी मंत्री अशी विविध पदं भूषविलेल्या गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर सर्वपक्षातील नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी धाव घेतली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गिरीश बापट यांच्या निधनानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याविषयी श्रद्धांजली वाहिली असली तरी गिरीश बापट यांच्याबरोबर आपले संबंध किती मैत्रीपूर्ण होते हेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री निती गडकरी यांनी गिरीश बापट यांच्याविषयी बोलताना सांगितले की, राजकारणात आल्यापासून त्यांचे आणि माझे संबंध सहृदयतेच राहिले आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले की गिरीश बापट यांचा माझा गेल्या 45 वर्षांपासूनचे त्यांचे आणि माझे संबंध राहिले आहे. त्यांच्याबरोबर दिल्लीत काम करत असताना एक वेगळा अनुभव मिळत गेला असल्याची भावनाही नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
गिरीश बापट यांना भाजप कधीही विसरणार नाही. कारण गिरीश बापट यांनी लोकांमध्ये जाऊन ज्या प्रमाणे भाजप रुजवली आहे. त्यामुळे त्यांचे सारखे काम फार कमी जणांनी केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गिरीश बापट यांनी भाजपचा विचार फक्त पुण्यापर्यंतच न करता त्यांनी राज्यातील गावागावापर्यंत भाजप पोहचवण्याचं कामही त्यांनी केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा जो विस्तार झाला आहे त्याचे मोठं काम गिरीश बापट यांनी केले असल्याचेही नितिन गडकरी यांनी सांगितले.
राज्यात आणि केंद्रात आज भाजप सत्तेत दिसत असले तरी त्यासाठी गिरीश बापट यांनीही मोठं काम करुन ठेवलं आहे. त्याचमुळे भाजपला राज्यात आणि पुण्यात मोठं यश मिळत असल्याचे मत नितिन गडकरी यांनी बोलून दाखवले.
गिरीश बापट यांनी ज्या प्रमाणे मोठ्या नेत्यांबरोबर संबंध ठेवले त्याचप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांबरोबरही त्यांनी संबंध ठेवले होते.
भाजपच्या प्रतिकूल काळातही गिरीश बापट यांनी प्रचंड मोठं काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाल्याची भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.