पुण्यात पुन्हा 2 नववधूंची कौमार्य चाचणी, मुलाचे वडील कोर्टातील निवृत्त अधीक्षक

पुणे: कंजारभाट समाजात पुन्हा एकदा कौमार्य चाचणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दोन नववधूंची कौमार्य चाचणी झाल्याचा आरोप आहे. धक्क्दायक म्हणजे, वराचे वडील नंदुरबार न्यायालयातील निवृत्त अधीक्षक, तर वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. कंजारभाट समाजाचे आणि धर्मदाय आयुक्त कार्यलयातील संचालक कृष्णा इंद्रेकर यांनी हा आरोप केला आहे. मागील महिन्यातही परदेशात उच्च […]

पुण्यात पुन्हा 2 नववधूंची कौमार्य चाचणी, मुलाचे वडील कोर्टातील निवृत्त अधीक्षक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

पुणे: कंजारभाट समाजात पुन्हा एकदा कौमार्य चाचणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दोन नववधूंची कौमार्य चाचणी झाल्याचा आरोप आहे. धक्क्दायक म्हणजे, वराचे वडील नंदुरबार न्यायालयातील निवृत्त अधीक्षक, तर वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. कंजारभाट समाजाचे आणि धर्मदाय आयुक्त कार्यलयातील संचालक कृष्णा इंद्रेकर यांनी हा आरोप केला आहे.

मागील महिन्यातही परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने वधूची कौमार्य चाचणी घेतल्याचा प्रकार समोर आला होता. आज पुन्हा हा प्रकार समोर आल्याने, कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची अघोरी प्रथा कधी थांबणार असा प्रश्न आहे.

कंजारभाट समाजातील अमानुष प्रथा – कौमार्य चाचणी कौमार्य चाचणी ही कंजारभाट समाजातील एक अत्यंत अमानुष प्रथा आहे. नवरी मुलगी खरी-खोटी ठरवण्यासाठी लग्नापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी मुलीची कौमार्य चाचणी केली जाते. कंजारभाट समाजात ही चाचणी सर्वांना बंधनकारक आहे. जात-पंचायत त्याबाबत न्यायनिवाडा करते. जातपंचायतीचे प्रमुख त्याचा निकाल देतात.

नव्या जोडप्याला एका खोलीत पाठवून पांढऱ्या चादरीवर/सफेद कपड्यावर शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं जातं. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक खोलीबाहेर असतात. शारीरिक संबंधावेळी रक्तस्त्राव झाला तर मुलगी ‘खरी’ म्हणजेच ती कौमार्य चाचणीत पास झाली म्हणतात. अन्यथा तिला नापास करुन लग्न मोडण्यापर्यंतचा अधिकार मुलाला असतो. जातपंचायत मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना शिक्षाही करु शकते. अशी अमानुष आणि जुनाट पद्धत कंजारभाट समाजात आजही पाळली जाते.

संबंधित बातम्या 

खळबळजनक! सुनेच्या कौमार्य चाचणीला पुण्यातील माजी नगरसेवकाची मान्यता  

पुणे : इंग्लंड रिर्टन मुलाने आणि जातपंचायतीने मुलीची ‘कौमार्य चाचणी’ केली 

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.