Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रवादीकडून हायजॅक, फडणवीसांचा हल्लाबोल, तर भूषणसिंह राजे होळकर म्हणतात…

अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गावर चालणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांना अडवलं हे निंदनीय आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तर दुसरीकडे भूषणसिंह राजे होळकर मात्र रोहित पवारांचं कौतुक करताना दिसून आले.

Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रवादीकडून हायजॅक, फडणवीसांचा हल्लाबोल, तर भूषणसिंह राजे होळकर म्हणतात...
अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रवादीकडून हायजॅक, फडणवीसांचा हल्लाबोलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 7:00 PM

पुणे : आज चौंडीत अहिल्यादेवी होळकरांच्या (Ahilyadevi Holkar) जयंतीचा कार्यक्रम रोहित पवारांनी आयोजित केला. मात्र या गावात जयंत साजरी करण्यासाठी जाणाऱ्या धनगर नेते गोपीचंद पडकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत यांना अडवण्यात आलं. त्यावरून मोठा वाद पेटला आहे. ता याच प्रकरावरून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला गेलेल्या गोपीचंद पडळकर यांना अडवने चुकीचं आहे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक करण्याचा प्रयत्न केलाय, अहिल्यादेवी होळकर यांच्या पावलावर, मार्गावर चालणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांना अडवलं हे निंदनीय आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तर दुसरीकडे भूषणसिंह राजे होळकर मात्र रोहित पवारांचं कौतुक करताना दिसून आले.

फडणवीस काय म्हणाले? ऐका

काय म्हणाले भूषणसिंह राजे होळकर?

मी देशभर फिरतो मात्र गड, किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाही हे आपलं दुर्दैव आहे. मात्र आज चौंडीत आल्यानंतर मला रोहित पवारांचा कौतुक वाटतं. अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरे बांधली ते फक्त पुजाऱ्यांची पोट भरण्यासाठी नाही, तर त्या मागे अनेक योजना होत्या. मंदिरातून गावचं अर्थकारण चालावे यासाठी मंदिरे बांधली. मात्र आता  प्रत्येकी वेळी राजकार केले जाते, हे राजकारण थांबले गेले पाहिजे, असे राजे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

रोहित पवारांनी मोठ्या उत्साहाने आज जयंती साजरी केली. शाहू महाराजांनी जे काम केले तेच काम अहिल्यादेवी होळकरांनी केले. त्यांनी जलस्त्रोत निर्माण केले, घाट बांधले, सुपीक जमीन पिकाऊ केली. सर्व धर्मियांना सौरक्षण देण्याचं काम त्यांनी केले. जिल्हा नियोजन मधून मी 25 लाख दरवर्षी जयंतीसाठी देण्याच वचन देतो, तसेच पहाडा सारख त्यांच्या मागे मी उभा राहीन, अशी प्रतिक्रिया यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो मी ज्या मातीतून येतो तिकडे परळी व्यद्यनाथ येथील मंदिर देखील त्यांनीच जीर्णोद्धार केला. आपण जयंती साजरी करतो मात्र आपण समाज्यात वाटून घेतले आहे. कधितरी आपल्याला विचार करावे लागेल, छत्रीपतींनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले, अशी प्रतिक्रिया यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

भरणेंचा पडळकरांना टोला

तर जलसंधारणचे मोठे काम अहिल्यादेवी होळकरांनी केले. तसेच पवार साहेब तुमचं नाव घेतल्या शिवाय राजकारण होत नाही. कोण खोटे आहे याची जागा लोकांनी दाखवून दिली. मागच्यावेळी आमचा समाज भुलला, मात्र आता सर्वांना जागा दाखवून दिले, अनेक लोक टीका टिपणी करतात, धनगर आरक्षण वेळी जे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाले ते मागे घेतले पाहिजेत, तरुणांना भडकून मीडियासमोर जाऊन समाज्याचे प्रश सोडू शकत नाही, आपल्या समाज्याचे प्रश्न फक्त पवार साहेबच सोडवू शकतात, असा टोला पडळकरांना भरणेंनी लगावाल.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.