Ajit Pawar : अजितदादा यांच्यानंतर आता दत्तात्रय भरणेंच्या गुलाबी शर्टाची जोरदार चर्चा, जनसन्मान यात्रेपूर्वी इंदापूर झाले गुलाबी

| Updated on: Aug 22, 2024 | 5:45 PM

Jansanman Yatra : सध्या अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेनंतर गुलाबी जॅकेट राज्यात भाव खाऊन जात आहे. उद्या इंदापूर मध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार भरणे यांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो पण यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

Ajit Pawar : अजितदादा यांच्यानंतर आता दत्तात्रय भरणेंच्या गुलाबी शर्टाची जोरदार चर्चा, जनसन्मान यात्रेपूर्वी इंदापूर झाले गुलाबी
गुलाबी रंगाची थीम
Follow us on

राज्यात लाडकी बहीण योजनेनंतर गुलाबी जॅकेटची चर्चा सुरु आहे. अजितदादा यांच्या गुलाबी शर्टने राज्यात राजकारणाचे रंग दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणूक अगदी जवळ आल्याने प्रत्येक राजकीय पक्ष ब्रँड इमेज तयार करण्याच्या मागे लागला आहे. समाजात पक्षाविषयी सकारात्मक संदेश जावा हा त्यामागील उद्देश आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेनंतर गुलाबी जॅकेट राज्यात भाव खाऊन जात आहे. उद्या इंदापूर मध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार भरणे यांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो पण यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

इंदापुरात दत्तात्रय भरणे यांच्या गुलाबी शर्टची चर्चा

अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट सोबत आता आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गुलाबी शर्ट ची इंदापूर मध्ये चर्चा रंगली आहे. उद्या इंदापूरमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार भरणे यांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो आहे. गुलाबी रंगाच्या कॅम्पेन मध्ये आता दादांसोबत आमदार दत्तात्रय भरणे देखील सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गुलाबी शर्ट ची थीम दिसून येत आहे. शहरात लावण्यात आलेल्या अनेक बॅनरवर भरणे यांच्या गुलाबी रंगाचा शर्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांना अगोदरच दिली तंबी

इंदापुर येथील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तुम्ही तर याच पण तुमच्या बायका पण घेऊन या, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे. चेष्टेचा विषय नाही. मी माझी सुध्दा बायको आणणार आहे, ती कधी येत नव्हती. तरी पण मी तिला आणणार आहे. सगळ्यांनी आपापल्या बायका अन् कोण असतील त्यांना पण घेऊन या.. असं ते म्हणाले. त्यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना वाट्टेल ते करा. व्हाटस्अपला सगळ्यांनी मेसेज पाठवा. महिला भगिनींच इतकं सगळं चांगलं झालंय की, त्यामुळं महिला भगिनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने हजर पाहिजेत, अशी तंबी दत्तात्रय भरणे यांनी पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरुन वाद चिघळण्याची शक्यता आहे. सध्या जनसन्मान यात्रेतून अजितदादा हा परिसर पिंजून काढत आहेत. तर माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी या मतदारसंघातून उभं राहण्याची कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात सहभागी होऊन तुतारी हाती घेणार का, याकडे या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.