फडणवीस म्हणाले, दादांसोबत कार्यक्रम म्हणजे 2-4 दिवस बातम्या, अजित पवार म्हणाले…..
Bhama Askhed Project | या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मीडियातील बातम्यांवरुन कोपरखळ्या मारल्या.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते भामा आसखेड (Bhama Askhed Project) योजनेचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मीडियातील बातम्यांवरुन कोपरखळ्या मारल्या. त्याला अजित पवारांनीही दुजोरा दिला. फडणवीस म्हणाले, “अजित पवारांसोबत एकाच मंचावर कार्यक्रम असला की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस बातम्या चालतात. हे नवीनच आहे”. यावर अजित पवार म्हणाले, “मी पण दोन चार दिवस पाहिलं. त्याच त्याच बातम्या दिसतात. बातम्या दाखवलाय काही नसलं की ते हे दाखवणारच” (Bhama Askhed Project inaugurated in presence of Ajit Pawar and Devendra Fadnavis )
दरम्यान या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने येऊन घोषणा देऊ लागले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. सातवर्षानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. मात्र त्याच्या श्रेयवादावरुन भाजप युवा मोर्चा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येऊन घोषणाबाजी देऊ लागले.
देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले “पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती. आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार. दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या. विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे,
“मी आणि अजित पवार एकत्र आलो की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस बातम्या चालतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादा आमदार कामानिमित्त मंत्र्यांना भेटायला गेला की लगेच तो पक्ष सोडतोय अशा बातम्या येतात. पण याची कधीच पर्वा करायचं कारण नाही. जनतेसाठी जिथे जावं लागेल तिथे जायचं, जे काम करायचं आहे ते आपण करायचं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती. आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार. दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या. विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अलिकडच्या काळात प्रचंड शहरीकरण होत आहे. सद्यस्थितीत शहरीकरण अपरिहार्य आहे. महत्वाचे काय तर शहरीकरण मॅनेज करणं. वाढत्या लोकसंख्येचा भार शेतीक्षेत्राला पेलवणारा नाही. पाण्याचा योग्य वापर करावा लागेल. पाणी हे इकॉनॉमी कमोडिटी आहे. जरी ते निसर्गाने दिलं असलं तरी, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळं चिंता करायची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांचं भाषण
यावेळी अजित पवार म्हणाले, “पुणे वाढतंय, लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. साडेअठरा TMC पाणी शहराला लागतंय. दोन लाख एकराला बारा महिने पुरेल एवढं पाणी पुणेकरांना देतील. अर्थात त्यात उपकार करत नाही, ती शहराची गरज आहे.
ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यावर पुण्याचे आठ आमदार, पंचायत समितीचे प्रतिनिधी सगळे मिळून बैठक घेऊ. सगळे प्रश्न कोणतेही राजकारण न करता मार्गी लावू. पुणेकर जेव्हा पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघरच चांगलं पाणी घेणार, तेव्हा खालच्या लोकांना खराब पाणी देण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळं नदीत खराब पाणी सोडले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
नदी सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प प्रभावीपणे राबविला पाहिजे. पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचे काम टाटाने थांबवलं पाहिजे. ज्या शहरात पिण्याचं पाणी व्यवस्थित वाढतं, ती शहरं झपाट्याने वाढतात. काही शहरांना रेल्वेने पाणी द्यावे लागलं, असं अजित पवार म्हणाले.
दोन-चार दिवस त्याच त्याच बातम्या
यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा धागा पकडला. “मी पण दोन चार दिवस पाहिलं त्याच त्याच बातम्या दाखवल्या जात आहेत. बातम्या दाखवलाय काही नसलं की ते हे दाखवणारच”
आज टँकर माफियांच्या पोटात दुखत असेल. कशाला ही योजना आली असं त्यांना वाटत असेल. पूर्व भागातल्या लोकांचं अनेक वर्षाचं स्वप्न साकार होतंय याचा आनंद होतोय. यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्रात जी परंपरा चालत आली आहे ती सुरु ठेऊ. शहराचा विकास करताना कोणालाही वाऱ्यावर सोडता कामा नये, असं नियोजन करुयात, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
ज्या भामा आसखेड योजनेवरून भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले ती काय आहे?
अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
(Bhama Askhed Project inaugurated in presence of Ajit Pawar and Devendra Fadnavis )