Ajit Pawar : असा हार आयुष्यात बघितला नाही, तुमचा हिरमोड करायचा नाही, याच पैशानं वह्या पुस्तकांसाठी मदत करा : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pwar) उपस्थितीत पुण्यात (Pune) खराडीत ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. भूमिपूजनानंतर अजित पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत पुण्यात (Pune) खराडीत ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. भूमिपूजनानंतर अजित पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. शहरातील 32 ठिकाणी आज कार्यक्रम घेतले,कोरोनामुळे आम्हाला सर्वांना नियम लावावे लागले, असं ते म्हणाले. नियम लावावे लागलेत, पटत नव्हतं पण नियम लावावे लागलेत. आरोग्यतल्या उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला. वेळ आली तर दंडही आकाराला, निर्बंध लावायला आम्हाला पटत नव्हतं, असं अजित पवार म्हणाले. आमचा नाईलाज होता, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना यावेळी क्रेननं हार घालण्यात आला. यावरुन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. हार घालण्याचा प्रकार मी आता बघितला, असा मी हार आयुष्यात कधीच घातला नाही. बारामतीत एवढ्या मतांनी निवडणून आलो तेव्हाही असा हार घातला नाही. मात्र याच पैशानं ज्याला गरज आहे त्याला मदत करा, कुणाला वह्या पुस्तकांना पैसे लागत असतील त्याला मदत करा. मला कुणाचा हिरमोड करायचा नाहीय, असंही अजित पवार म्हणाले.
निधीची कमतरता पडून देणार नाही
अजित पवार यांनी 14 तारखेला महापालिकेच्या नगरसेवकांची टर्म संपत आहे, म्हणून आज उद्धघाटन केलीत. मात्र, प्रशासक आल्यावरही आपण काम करून घेऊ शकतो, त्याची उदघाटन करता येईल. ऑक्सिजनच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. मिशन ऑक्सिजन उपक्रमाचा आपल्याला फायदा होणार आहे. कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही फार विचारपूर्वक आम्ही हा अर्थसंकल्प दिला आहे.
यंत्रणाचा गैरवापर होतोय, दोघांकडून हे होतंय
आपल्या विचाराच्या महापालिका निवडून आल्या तर अधिक जोमाने काम करता येईल. काही जण सत्तेत येणार काही विरोधात असणार आहेत. मात्र, यंत्रणांचा गैरवापर होतोय, कुणाला तरी संपवण्याचा काम केलं जातंय.हे होता कामा नये, हे दोघांकडून होतंय, हे आधी होत नव्हतं आताच व्हायला लागलं, असं अजित पवार म्हणाले. काहीजण वाटेल तर वक्तव्य करतायत, काही मागे पुढे बघत नाहीत. जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेऊ नये, असंही अजित पवार म्हणाले.
लोकशाहीत जय पराजय स्वीकारावा लागतो
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम करण्यासाठी आयोग नेमला आहे. दोन ते तीन महिन्यात त्यांनी डेटा गोळा करावा, त्यासाठी आम्ही त्यांना सर्व दिलं आहे. त्यामुळे दोन ते तीन महिने निवडणुका लांबण्याची शक्यता आहे. मध्येच अफवा उठली दोनचा प्रभाग होणार मात्र आधी जे ठरलंय त्याप्रमाणे तीनचा प्रभाग असणार आहे. दोनचा प्रभाग डोक्यातून काढून टाका, असं अजित पवार म्हणाले. पाठीमागच्या काळात पुण्याची सूत्र माझ्याकडे सोपवली होती, पिंपरीत 25 वर्ष माझ्याकडे सूत्र दिली होती. मात्र, मधल्या काळात आमचा पराभव झाला, लोकशाहीत जय पराजय स्वीकारावा लागतो. मात्र राज्याची आर्थिक नाडी आपल्या हातात आहे, त्यामुळे आता सर्वांनी आम्हाला साथ दिली पाहिजे, अंसं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :
Video : उमा भारतींची दारूबंदी मोहीम चिघळली, दारूच्या दुकानात घुसून दगडफेक, बाटल्या फोडल्या