पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (2 जुलै) पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी नुकताच झालेला महापौरांच्या निमंत्रणावरील वादावरही भाष्य केलं. “पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो. मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही,” असं आश्वासन अजित पवार यांनी यावर दिलंय. तसेच मुंबईतील बैठकीचं निमंत्रण मी स्वतः महापौरांना दिलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं (Ajit Pawar comment on invitation controversy of Pune Mayor Murlidhar Mohol).
अजित पवार म्हणाले, “मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं. मात्र बातम्या वेगळ्या आल्यात. आज त्यासंदर्भात माझी महापौर आणि माझी चर्चा झाली. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झालेत. यापुढे असं होणार नाही असा आदेश प्रशासनाला दिला आहे. मी पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापूढे असं होणार नाही.”
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला. ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्यानं ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावं, असं सूचित केलं. ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. pic.twitter.com/2uFQr4LZSZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2021
“18 वर्षांपुढील खेळाडूंना ग्राउंडवर खेळण्याची परवानगी देण्यात आलीय. राज्य सरकार नवीन 500 रुग्णवाहिका घेणार आहे. पुण्याचा पोझिटिव्हीटी रेट गेल्या आठवड्यात 4.6 टक्के होता आणि 5.3 टक्के झाला आहे. जी नियमावली होती तीच नियमावली कायम ठेवण्याचा निर्णय झालाय,” असंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “मागच्या बैठकीला ऑफिसच्या कामामुळे मला येता आलं नाही. दुर्दैव असं की एखादी बैठक टाळली तर लगेच चर्चा वेगळी होते. आंबिल ओढ्याच्या तोडकामासंदर्भात जी चर्चा झाली, त्याबाबत माझा काही संबध नाही. यामध्ये बऱ्याचदा राजकारण आणलं जातंय.”
Ajit Pawar comment on invitation controversy of Pune Mayor Murlidhar Mohol