नाना पटोले भेटल्यावर विचारणार, अक्षय, अमिताभच्या शूटिंगला विरोध का? : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाला विरोधाच्या मुद्द्यावर नाना पटोलेंशी बोलणार असल्याचं मत व्यक्त केलंय.

नाना पटोले भेटल्यावर विचारणार, अक्षय, अमिताभच्या शूटिंगला विरोध का? : अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 4:55 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाला विरोधाच्या मुद्द्यावर नाना पटोलेंशी बोलणार असल्याचं मत व्यक्त केलंय. ते पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस हा एक महत्त्वाचा पक्ष असून त्याचे ते प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांना जे योग्य वाटलं त्यावर त्यांनी भाष्य केलं असेल, असंही नमूद केलं (Ajit Pawar comment on statement of opposing shooting of Amitabh Bachchan and Akshay Kumar Film).

अजित पवार म्हणाले, “अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटांची शुटिंग होऊ देणार नाही असं मी सांगितलेलं नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटल्याचं मी वाचलं आहे. याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे ते असं का म्हणाले. माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. मी रात्री सर्व कार्यक्रम संपल्यावर शिवनेरीला आलो. शिवनेरीहून इथं आलो. ज्यावेळी नाना पटोले मला भेटतील तेव्हा मी त्यांना विचारेल की काय कारण घडलं ज्यामुळे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही.”

“संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात ट्विट करुन इंधन दरवाढीवर टीका करणारे अभिनेते आज त्यावर बोलत नाही म्हणून नाना पटोलेंच्या डोक्यात तसा विचार आला असेल म्हणून ते बोलून गेले. ते एका महत्त्वाच्या पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी त्यावर भाष्य केलं असेल,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“टोलवा टोलवी करत मागच्यांमुळे असं झालं हे सांगण्यात काडीचा अर्थ नाही”

इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान मोदींनी आधीच्या सरकारवर खापर फोडण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले, “टोलवा टोलवी करत मागच्यांमुळे असं झालं हे सांगण्यात काडीचा अर्थ नाही. तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. मागच्यांच्या काही चुका झाल्या तर तुम्ही दुरुस्त करा आणि लोकांना मदत होईल हे पाहा. मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की पेट्रोचे दर 100 रुपयांच्या वर जातील. परभणीत पट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेलंय. खरंतर पेट्रोलचे दर वाढताय, डिझेल वाढतंय, गॅस सिलिंडरचे दर वाढतायेत. गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यामुळे अगदी त्रासून गेलाय. इंधनाच्या किमती वाढतात तेव्हा सर्वच गोष्टींचा महागाईचा आगडोंब उसळतो. इंधनाचे दर कमीच झाले पाहिजेत. ही माझी इच्छा नाही, तर प्रत्येकाची इच्छा आहे. त्यांच्या नेत्यांनाही वाटतं मात्र त्यांचा नाईलाज आहे ते गप्प बसतात.”

“आम्ही अधिवेशनाच्या दिवशी कोणते कर कमी करणार आणि कोणते वाढवणार हे सांगू”

“आम्ही अधिवेशनाच्या दिवशी कोणते कर कमी करणार आणि कोणते वाढवणार हे सांगणार आहोत. शेवटी राज्याचा गाडा पुढे चालवत असताना काही प्रमाणात कर्ज काढावं लागतं. केंद्राचा पैसा काही ठरल्याप्रमाणे यावा लागतो आणि काही कर रुपात पैसा जमा करावा लागतो. याच पैशातून राज्य आणि देश चालतो,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीला कुणीही घाबरत नाही”

अजित पवार म्हणाले, “विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीला कुणीही घाबरत नाही. ज्यावेळी सरकार चालवायचं असतं तेव्हा कोणत्याही प्रसंगाला सामोरं जावं लागतं. जर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीला आम्ही घाबरलो असतो तर राजीनामाच होऊन दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटून नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या हायकमांडने सांगितलं आणि नंतर ते महाविकासआघाडीचे सदस्य म्हणून ते आम्हाला भेटले.”

हेही वाचा :

संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन पत्रकार तुमची वाट बघतायत : अजित पवार

अंगभर दागिने घालता, फिरायला गेल्यावर फोटो टाकता, मग चोरांना घर मोकळंच, अजितदादांची फटकेबाजी

खासदार श्रीकांत शिंदेंकडून रायगडावर लायटिंग, अजित पवार म्हणाले, उत्साही लोकांचा अजाणतेपणा!

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on statement of opposing shooting of Amitabh Bachchan and Akshay Kumar Film

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.