Ajit Pawar : पंतप्रधान कार्यालयाने अजित पवारांचे भाषण डावलले? कार्यक्रम दिल्लीतून ठरुन आलेला होता, नितीन महाराज मोरे यांची माहिती
राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षनेते फडमवीस यांचे भाषण होते, तर अजित पवारांचे का नाही, असा प्रश्न विचाला असता, याबाबत त्यांनाच हा प्रश्न विचारा असेही नितीन महाराजांनी सांगितले आहे.
देहू, पुणे – देहूतील (Dehu) शीळा लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण झाले नसल्याने नवा वाद सुरु झाला आहे. हा कार्यक्रम दिल्लीतून पंतप्रधान कार्यालायतून ठरुन आल्याची माहिती तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. मुंबईत पंतप्रधानांचे पुढचे काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळे, कार्यक्रमात अजित पवार यांचे भाषम झाले नसावे असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षनेते फडमवीस यांचे भाषण होते, तर अजित पवारांचे का नाही, असा प्रश्न विचाला असता, याबाबत त्यांनाच हा प्रश्न विचारा असेही नितीन महाराजांनी सांगितले आहे. तर पंतप्रधानांच्या मिनिट टू मिनिट कार्यक्रमात अजित पवारांच्या भाषणाचा उल्लेखच नव्हता असे भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिली आहे,
अजित पवारांचे भाषण न होणे हा महाराष्ट्राचा अपमान
तर अजित पवार यांचे देहूच्या कार्यक्करमात भाषण न होणे हा राज्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून अमरावतीत केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी आक्रमक मोडमध्ये
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 14, 2022
पंतप्रधान कार्यालयाने डावलले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात अजित पवारांचे भाषण व्हावे, याची विनंती करणारे पत्र पंतप्रधान कार्यालयाने फेटाळल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. याचाच अर्थ पंतप्रधान कार्यालयाकडून हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शक्यता आहे.
पंतचप्रधानांनीही कार्यक्रमात केले सूचित
दरम्यान प्रत्यक्ष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधानांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांचे भाषण का नाही, असे देवेंद्र यांनी इशाऱ्याने विचारले, तसेच अजित पवारांनी भाषण करावे असेही सुचवले, त्यावर अजित पवारांनी नाही असे सांगत पंतप्रधानांचे म्हणणे नाकारले. आता या सगळ्यावरुन राज्यात राजकीय वाद सुरु झाला आहे.