Baramati Accident : गाड्यांचा ताफा थांबवून अजित पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली आहे. माळेगाव कॉलनी येथे हा अपघात (Accident) झाला होता. अजित पवार यांनी दूरध्वनीवरून माहिती घेत उपचारासंबंधी सूचना दिल्या.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली आहे. माळेगाव कॉलनी येथे हा अपघात (Accident) झाला होता. अजित पवार यांनी दूरध्वनीवरून माहिती घेत उपचारासंबंधी सूचना दिल्या. अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनातून अपघातग्रस्तांना रुग्णालयात (Hospital) दाखल केले. बारामतीतील गिरीराज हॉस्पिटलमध्ये संबंधित व्यक्तीसह मुलीवर आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. अजित पवार सध्या बारामतीत आहेत. विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच इतर शासकीय कामांसंदर्भात ते बारामतीत आहेत. तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ग्रामसुरक्षा दलदेखील (Gram Suraksha Dal) स्थापना करण्यात आले. त्यातच अपघाताची बातमी त्यांच्या कानी आली. त्यांनी तातडीने अपघात झालेल्यांना मदत केली. माळेगाव कॉलनी इथे हा अपघात झाला.
अपघातग्रस्तांना दिलासा
अपघाताच्या वृत्तानंतर अजित पवार यांनी संबंधित अपघातग्रस्तांची माहिती घेतली. त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपल्याच ताफ्यातील वाहने देऊन अपघातग्रस्तांना दिलासा दिला. त्यामुळे जखमी झालेल्यांवर वेळीच उपचार सुरू झाले.
#Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली आहे. माळेगाव कॉलनी येथे हा अपघात झाला होता.@AjitPawarSpeaks @NCPspeaks #ajitpawar #baramati #ACCIDENT अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/gxKp9V7yts
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 10, 2022