Baramati Ajit Pawar : रात्री 11 वाजताही असते विकासकामांवर करडी नजर; अजित पवारांचा बारामतीतला हा Video पाहिला का?

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अजित पवार बारामतीतील कामांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला आहे.

Baramati Ajit Pawar : रात्री 11 वाजताही असते विकासकामांवर करडी नजर; अजित पवारांचा बारामतीतला हा Video पाहिला का?
रात्री अकरावाजता विकासकामांची पाहणी करताना अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 11:24 AM

बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या कामाबद्दल नेहमीच प्रामाणिक असतात. प्रत्येक कामावर करडी नजर ठेवून ते काम दर्जेदार झालेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळेच पहाटेपासून अजित पवार आपल्या कामास सुरुवात करतात. एवढ्यावरच न थांबता ते अधूनमधून एकटेच बारामतीत (Baramati) फेरफटका मारत असतात. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अजित पवार बारामतीतील कामांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला आहे. शहरातील विद्या प्रतिष्ठान परिसरात सुरू असलेल्या कामाची अजित पवार यांनी पाहणी केली. या कामाची त्यांनी बारकाईने पाहणी करताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तुम्ही मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. मग मी माझ्या कामात का हयगय करावी, असे ते आपल्या भाषणातून सांगत असतात, त्याचाच प्रत्यय या व्हिडिओच्या निमित्ताने आला आहे.

बारामतीत विविध कामांचा केला शुभारंभ

अजित पवार सध्या बारामती आहेत. काल त्यांनी विविध ठिकाणच्या कामांचे उद्घाटन केले. तसेच भाषणांमधून विरोधकांना टोलेही लगावले. अर्थमंत्रालय आपल्याकडे असल्यामुळे बारामतीला झुकते माप देतो, असे त्यांनी काल बिनदिक्कतपणे सांगितले होते. बारामतीसाठी आपला हात ढिला होतो आणि त्यामुळे शहराचा विकास होत असल्याचेही ते म्हणाले. बारामती शहरात आम्ही झाडे लावत आहोत, मात्र कुणीतरी त्या झाडाचे शेंडे तोडत आहे. त्याला आपण शोधत आहोत, असे सांगत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. शनिवारी सकाळपासून अजित पवारांनी बारामतीचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

‘पुण्याला जावे लागू नये’

बारामतीत सुविधा नाहीत, म्हणून कुणाला मुंबई–पुण्याला जायला लागू नये, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी जपून वापरण्याचा सल्लाही त्यांनी काल बारामतीकरांना दिला होता. कालच्याच एका कार्यक्रमात त्यांनी पुढील 25 वर्षांचे बारामती परिसराचे नियोजन करत असल्याचे सांगितले. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

अजित पवारांचा विकासकामांची पाहणी करतानाचा व्हिडिओ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.