बारामतीतून नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून लढण्यासाठी अजित पवार इच्छुक होते; दादांनी स्वत: केला खुलासा

Ajit Pawar Loni Kalbhor Bhashan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला सभा झाली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार बारामती नव्हे तर 'या' मतदारसंघातून लढणार होते. वाचा सविस्तर बातमी...

बारामतीतून नव्हे तर 'या' मतदारसंघातून लढण्यासाठी अजित पवार इच्छुक होते; दादांनी स्वत: केला खुलासा
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 1:56 PM

राज्याच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती विधानसभा मतदारसंघाची… या मतदारसंघात पहिल्यांच अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळतेय. या मतदारसंघात काय होणार? याकडे राज्याचं लक्ष आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. आपण बारामतीतून लढणारच नव्हतो, असं अजित पवार म्हणालेत. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला अजित पवार यांची सभा झाली. यावेळी त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. बारामतीत यंदा उभं राहणारच नव्हतो. मी शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलो होतोय तशी चाचपणी करायला लावली होती, असा खुलासाच खुद्द अजित पवार यांनी केलाय.

अजित पवारांचा मोठा खुलासा

बारामतीतून उभं रहाणार नव्हतो. शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलेलो. शिरुर, पुरंदर, सिन्नर विधानसभा मतदार संघातून संधी होती. असा खुलासाही अजित पवारांनी शिरुरमधील सभेतून केला. आता तुम्ही माझी करु नकाय बारामतीकर पाहून घेतील असं म्हणत बारामतीची परिस्थिती सुधारलीय, असंही अजित पवार म्हणाले.

महायुतीचं सरकार आणायचं आहे- अजित पवार

वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे. महायुती सर्व जण आता प्रचार करत आहे. तगडे उमेदवार देण्याचा पर्यंत केला आहे. पुढच्या वेळी मतदारसंघाची फेर रचना होणार आहे. महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी केलं आहे. मागच्या निवडणुकीत झालेले त्रुटी आम्ही सुधारतोय. कारण त्यावेळेस एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. त्याची किंमत महायुतीला मोजावी लागली. आपल्याला पुन्हा महायुतीचा सरकार राज्यामध्ये आणायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

बजेटमध्ये आम्ही ठरवलं होतं की, आपल्याकडून कोणतेही घटक राहिले नाही पाहिजे. त्यामध्ये माय माऊलींकडे म्हणजे आतापर्यंत कोणत्याही सरकारने लक्ष दिलं नाही. त्यांच्यासाठी आमच्या सरकारने योजना आणल्या. अनेक योजनांसाठी 75 कोटी लागले आणि विरोधक कोर्टात गेले. तर आता बोलतात आमचे सरकार आले तर या योजना बंद करू आता यांच्या पोटात का दुखतं? पुढे या योजना चालू ठेवायचा असेल तर महायुतीचे सरकार आले पाहिजे. यांनी सांगितले तिजोरीत पैसेच राहिले नाही. घ्या काढून असं सांगितलं गेलं. आता भावाने एकदा ओवाळणी टाकल्यानंतर पुन्हा भाऊ मागे घेतो का? यांच्या काकांनी असे केलं होत का?, असं म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय.

Non Stop LIVE Update
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.