होय मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांनी उघडपणे इच्छा बोलून दाखवली
Ajit Pawar on Mahayuti Seat Allocation Formula : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला आहे. आम्ही सगळेच... प्रयत्नशील आहोत, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी जागावाटपावर भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
विधासभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे. अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला आहे. महायुतीच सरकार आणणं आमचं पहिलं टार्गेट आहे. महायुतीची सगळे घटक आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. जागावाटपाच बरेच काम झालेलं आहे. काही ठिकाणी मार्ग निघाला नाही तर आम्ही बसून मार्ग काढू. जागावाटप झालं की आम्ही जाहीर करू, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत 80 ते 90 जागा लढण्यावर दावा केला असल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी राज्यात सुखी ठेव अशी प्रार्थना केली. गणपतीची पूजा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यनमंत्रिपद मिळावं, असं वाटतं. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आलो. पण मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. सर्वांचीच इच्छा पूर्ण होते, असं नाही, असं अजित पवार म्हणाले.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
बालपणीच्या आठवणी जाग्या होत असतात. पण आताची वेळ वेगळी आहे. त्या आठवणींना उजाळा मिळाला. उत्सवात वेगळे प्रकार होता कामा नये. त्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. डीजेबाबत सीपी यांनी पत्रक काढलं आहे. लोकांना आवाजाचा त्रास होतो आहे. आपल्या उत्साहामुळे दुस-यांना त्रास व्हावा अस करु नये, असं अजित पवार म्हणाले. जागा वाटपाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आम्ही त्याबद्दल आमच टार्गेट महायुतीचे सरकार आणणं आहे. जागा वाटपाचे काम झालं आहे. नाही झालं तर बसून त्याबर काम करु. तिघे एकत्र बसून जाहीर करु तेव्हा तुम्हाला कळेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज आले आहे. राज्यात महायुतीचं सरकार येईल, असं चाकणकर म्हणाल्या.