उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहे. इथे त्यांनी डीपीडीसी बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांवर भाष्य केलं. राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद जागांपैकी भाजपकडे 6 जागा असतील. एकनाथ शिंदे यांना 3 जागा आणि आम्हाला 3 जागा मिळतील अशी शक्यता आहे. आमची इच्छा होती की 4-4 तिघांना जागा मिळाव्या. पण तसं होण्याची शक्यता कमी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हवामान खात्याने रेड अलर्ट दिला की पाऊस पडत नाही असं होतंच…. पण अजूनही धो धो पावसाची अपेक्षा आहे. सकाळी आढावा घेतला आहे. पाणी धरणात चागलं झालं आहे पण अजून पाऊस पडायला हवा. महिलांना समृध्द करण्यासाठी 15 ऑगस्ट ला त्यांच्या खात्यावर पैसे देण्याचा मानस आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
‘धडपड भाग 2’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुस्तक प्रकाशन वेळ द्यायला उशीर झाला. व्यस्त होतो पण वेळ काढावा लागतो. मीच अगोदरच्या भागाचं पण पुस्तक प्रकाशन केलं होतं. धडपड भाग 2 आज प्रकाशन झाल अस जाहीर करतो. पुस्तक किंमत कमी दरात ठेवलं आहे. शून्यातून जग ज्यांनी निर्माण केलं,या पुस्तकातील अनेक शी संबंध आला आहे. कमी शब्दात एका एकाचा उल्लेख केला आहे,खूप लोकांबद्दल लिहलं आहे. अनेकांच्या या बाबतीत लिहिलं आहे. श्याम दौंडकर यांची कारकीर्द पहिली आहे, त्याचं मी अभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले.
माझ्या धडपडीची किस्से लिहिले आहे पण ऐकीव लिहिले आहे. मला विचारले असते तर मी अजून किस्से सागितले असते. त्यांनी माझ्यावर जास्त लिहण्यापेक्षा स्वतःवर लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील राजकीय समजिक जडणघडण कशी घडली ते सगळं लिहलं आहे. अगोदर प्रिंट होतच पण आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आली. अनेक जण सोशल मीडियावर लिहित असतात. पत्रकार पण चुकतात हे पण त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. त्याबद्दल त्याच आभार…, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.