पुण्यातील बराचसा भाग पाण्याखाली; अजित पवारांचं नागरिकांना महत्वाचं आवाहन

Ajit Pawar on Pune Rain Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद सुरु आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अजित पवार काय म्हणाले? वाचा...

पुण्यातील बराचसा भाग पाण्याखाली; अजित पवारांचं नागरिकांना महत्वाचं आवाहन
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 3:18 PM

काल रात्रीपासूनच पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना महत्वाचं आवाहन केलं आहे. पाऊस आता आटोक्यात आला आहे. नागरिकांनो घाबरून जाऊ नका. पूरस्थितीत प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे. सगळ्या धरणाचं पाणी कॅनॉलमध्ये सोडायला सांगितलं आहे. आम्ही लष्कराला पण अलर्ट राहायला सांगितलं आहे. एकतानगरमध्ये 100 लष्कराचे लोक आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरू नका, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा या परिस्थितीवर लक्ष आहे. फूड पॉयझनिंग कोणाला होऊ नये याची दक्षता घेतली गेली आहे. मुळशी धरण सुद्धा भरलं आहे. तिथे वीज निर्मितीसाठी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अलर्ट राहायला सांगितलं आहे. सिंहगड रोडवर आर्मीची एक तुकडी आणि एक एनडीआरएफची एक टीम तैनात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. पण सतर्क राहावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

पर्यटनाला जाऊ नका- अजित पवार

धबधबे पाहण्यासाठी लोकांना उत्साह असतो. पण त्यांना माझं आवाहन आहे की, दोन दिवस तिथे जाऊ नका. लवासामध्ये वरचा मलबा पडला आहे. तिथले रस्ते वाहून गेले आहेत. तिथे पीडब्ल्यूडीचे अधिकारी चालले आहेत. जर कोणी अडकले असेल तर आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनाधिकृत वीज घेतली होती असा अंदाज आहे. म्हणून पुण्यातील तीन जणांचा डेक्कन भागात त्यांचा मृत्यू झाला आहे. जे जखमी झाले आहेत त्याचा खर्च शासन आणि महापालिका करेल. ज्या सोसायटी टाक्यांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यांना टँकरने पाणी दिलं जाईल. पुण्यातील वारजे भागात म्हशी ज्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्याचे सुद्धा पंचनामे केले जाणार आहेत, असं अजित पवार म्हणाले.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

दरम्यान, खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवणार आहेत. संध्याकाळी चार वाजता मुठा नदीतून 35 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडणार आहेत. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवणार आहेत. 35 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर पुन्हा एकदा अनेक भागात पाणी शिरणार आहे.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.