Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

| Updated on: Apr 09, 2022 | 10:21 AM

अजित पवार म्हणाले की, एकीकडे शरद पवारांच्या घरावर हल्ल्याचा निषेध पण करायचा आणि दुसरीकडे हे प्रकरण कसे नेता येईल याचा प्रयत्न करायचा. याला काहीही अर्थ नाही, अशी टीकाही भाजपवर केली.

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या
अजित पवार, उपमुख्यमंत्री.
Follow us on

पुणेः मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा एकीकडे निषेध पण करायचा आणि दुसरीकडे हे प्रकरण कसे नेता येईल याचा प्रयत्न करायचा. याला काहीही अर्थ नाही म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अक्षरशः उडवून लावल्या. ते पुण्यामध्ये आले असता बोलत होते. दिवाळीपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी वेगळे वळण लागले. संतप्त आंदोलकांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर त्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडही फेकले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ सिल्व्हर ओकवर पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आंदोलकांना चिथावणी दिल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी कालच अटक केलीय. या साऱ्या प्रकरणाचा भाजपने निषेध नोंदवला. मात्र, हा निषेध बेगडी असल्याचा हल्लाबोल अजित पवारांनी केलाय.

काय म्हणाले अजितदादा?

अजितदादा म्हणाले की, पोलीस विभाग त्यांचे काम करत आहे. मात्र, या आंदोलकांची माथी भडकवण्यात आली आहेत. त्यामागे कोण आहे, याचा शोध पोलीस घेतायत. दिलीप वळसे – पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलीय. मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी आंदोलन यशस्वी झाले म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय होता, असा सवाल त्यांनी केला. हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. तिथे जाणारे लोक मीडियाला घेऊन पोहचले. मग मीडियाला जे कळाले ते पोलीस यंत्रणेला का कळले नाही, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

धादांत खोटा आरोप…

भाजपने या हल्ल्याचा निषेध केलाय. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारने आत्मपरीक्षण करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. यावर अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांनी सुरुवातीला नेहरू सेंटरमध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीला अनिल परब, उदय सामंत, मी, सदाभाऊ खोत इतरही अनेकजण होते. फक्त ती बैठक कुणाला जास्त कळू द्यायची नव्हती. त्यानंतर आम्हीही अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे हा हा धादांत खोटा आरोप असल्याचे ते म्हणाले.

ही संस्कृती नव्हे…

अजित पवार म्हणाले की, एसटी आंदोलकांनी नंतर संघटनांचे ऐकणेही बंद केले. त्यांनी तारतम्य सोडले. त्यांनी जी भाषा वापरली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. तुम्हालाही ती भाषा आवडणार नाही. शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्यामागे कोण मास्टरमाइंड आहे, याचा पोलीस यंत्रणा याचा तपास करून शोध घेईल. एकीकडे शरद पवारांच्या घरावर हल्ल्याचा निषेध पण करायचा आणि दुसरीकडे हे प्रकरण कसे नेता येईल याचा प्रयत्न करायचा. याला काहीही अर्थ नाही, अशी टीकाही भाजपवर केली.

इतर बातम्या : 

Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…

ST Andolan Mumbai : ज्या भगिनी विधवा झाल्या…, पवारांच्या घरी काढलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया