Pune Ajit Pawar : ‘एसटी कामगारांना सांगत होतो, चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, ऐकलं नाही’

एसटी कामगारांना (ST Employees) सांगत होतो, चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, पण ऐकले नाही. काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.

Pune Ajit Pawar : 'एसटी कामगारांना सांगत होतो, चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, ऐकलं नाही'
सुपे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 9:49 AM

पुणे : एसटी कामगारांना (ST Employees) सांगत होतो, चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, पण ऐकले नाही. काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. सुपे (Supe) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जवळपास 4 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच मयुरेश्वर पतसंस्था, राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते यावेळी झाले. एसटी कर्मचारी संप तसेच पीएमपीएमएलविषयी ते म्हणाले, की पीएमपी बस 700 कोटींच्या तोट्यात आहे. एसटीपेक्षाही कमी तिकिट ठेवले आहे. आता पिंपरी आणि पुणे महानगरपालिकांकडून इलेक्ट्रीक बसेस खरेदी होणार आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा संबंधित संस्थेला परवडत नाहीत. मात्र इलेक्ट्रीक बसेस सुरू झाल्यावर संबंधित संस्थांनाही फायदा होईल, असे ते म्हणाले.

‘राजकारण होवू नये’

कोरोनामुळे अडचणींना सामोरे जावे लागले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले. आता कुठे आपण सावरायला लागलो आहोत. अनेक प्रश्न आहेत. एकमेकांशी चांगले वागा. गैरसमज पसरवू नका. बंधूता, एकात्मता जपा ही साहेबांची शिकवण आहे. संस्थेतून लोकांना मदत व्हावी. राजकारण होवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका’

बोलण्याच्या ओघात माणूस विसरून जाऊ शकतो. त्याचा गैरअर्थ काढू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्याला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

‘जेवढे पाणी आहे तेवढाच ऊस लावा’

जेवढे पाणी आहे तेवढाच ऊस लावा. आम्हालाही काळजी आहे. पण ऊस लावायचा अन् पाणी कमी पडले की ओरड करायची. त्यापेक्षा पाण्याची उपलब्धता बघून ऊस लावा. कारखाने चालवणे सोपे नाही. भीमा पाटसची काय अवस्था झाली आहे? ऊस आहे, पाणी आहे. पण कारखान्याची अवस्था काय..? तुमचा प्रपंच त्यावर चालतोय. त्यामुळs अडचणींवर मार्ग काढतोय, असे ते यावेळी म्हणाले.

आणखी वाचा :

Anil Deshmukh: अनिल देशमुखांची संपत्ती परत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले; रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत

Heat : पुणेकरांना अजून काही दिवस सहन करावा लागणार उन्हाचा चटका! हवामान विभागानं काय सांगितलं?

Pune Neelam Gorhe : ‘कोर्टाचा आदेशही धुडकावणाऱ्या आंदोलकांचा हेतू पवार कुटुंबीयांना इजा करण्याचा असावा’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.