“इमारतीचं बांधकाम चांगलं करा, पुणे शहराच्या वैभवाला शोभेल अशी इमारत उभी करा, उद्घाटनाला आम्हीच येणार”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीच बांधकाम चांगल करा, पुणे शहराच्या वैभवाला शोभेल अशी इमारत उभी करा. उदघाटनाला आम्हीच येणार आहोत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. Ajit Pawar Pune city

इमारतीचं बांधकाम चांगलं करा, पुणे शहराच्या वैभवाला शोभेल अशी इमारत उभी करा, उद्घाटनाला आम्हीच येणार
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 12:45 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीचं बांधकाम चांगलं करा, पुणे शहराच्या वैभवाला शोभेल अशी इमारत उभी करा. उदघाटनाला आम्हीच येणार आहोत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. अजित पवारांनी राज्यातील जनतेला शुद्ध पाणी देण्याची गरज असल्याचं म्हटलं. (Ajit Pawar said build well building will enrich the prosperity of Pune city)

तर 100टक्के पुण्य महाविकास आघाडीला मिळेल

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले पाणी म्हणजे पुण्य आहे. राज्यातील जनतेला शुद्ध पाणी देणे गरजेचे आहे. लोकांच राहणीमान बदलतय, पाण्याचा वापर वाढतोय. नागरीकरण झपाट्याने वाढत असताना धरण आहे तेवढीच आहेत, ती वाढत नाही, असं ही ते म्हणाले. समाजातील वंचित, गोरगरीब जनतेला त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अर्थसंकल्पात या सगळ्याचा विचार केला जाईल. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. गुणवत्तापूर्ण पाणी दिलं तर 100टक्के पुण्य महाविकास आघाडीला मिळेल. जातीयवादी भूमिका बाजूला सोडून सर्वधर्म समभाव पुढे न्यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी यावेळी बोलताना पेट्रोल दरवाढ कमी करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. भाजपला वीज बिल माफ करण्याचा फॉर्म्युला कळलेला नाही. त्यांनी तो फॉर्म्युला आधी वाचाव अन वाचून लोकांना सांगावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. कोरोना काळात कर्जमाफी केली हे का भाजपवाले का बोलत नाहीत.

जलयुक्त शिवारचं नाव बदललं म्हणून पाण्याची पातळी वाढत नाही.राज्यातील जनतेला पिण्याचं शुद्ध पाणी देण्यात मागच्यावर्षी शासनाने मोठे योगदान राहिलं आहे. राज्यात एकूण जिल्हा आणि तालुका पातळीवर 175 प्रयोगशाळा पाणी तपासणी करत आहेत.राज्याची संदर्भ संस्था म्हणून या नवीन ठिकाणाहून काम चालेल. सात कोटी आणि 79 लाख रुपये खर्च करुन नव्या प्रयोगशाळेची उभारणी केली जातीये, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या:

पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं : अजित पवार

उद्धव ठाकरेंमधील छायाचित्रकार जागा, लोणार सरोवर पाहणीवेळी मोबाईल फोटोग्राफी!

(Ajit Pawar said build well building will enrich the prosperity of Pune city)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.