दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई, कुणाचीही हयगय करणार नाही: अजित पवार
अजित पवार यांनी याविषयी बोलातना राज्य सरकार या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करेल, असं म्हटलंय. Ajit Pawar Deepali Chavan

पुणे: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी बोलातना राज्य सरकार या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करेल, असं म्हटलंय. (Ajit Pawar said government will take action those responsible for suicide of Deepali Chavan)
अजित पवार नेमंक काय म्हणाले?
दीपाली चव्हाण यांचं संभाषण समोर आलंय. तसेच त्यांचं पत्रही या प्रकरणात पुढे आलेलं आहे. कुणीही वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकारी असला तरी एकमेकांचा मानसन्मान ठेवून काम केलं पाहिजे. ही घटना अतिशय दु:खद आहे. यात जे कोणी जबाबदार असतील ते तपासात समोर येईलच. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. याबाबत कोणाचीही हयगय केली जाणार नाही याची सरकार जबाबदारी घेईल, असं अजित पवार म्हणाले.
राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य पवार यांनी केले. आपापली जबाबदारी लक्षात घेवून नियमांचे उल्लंघन न करता होळी साजरी करा.सध्याची परिस्थिती पाहता शांतपणे होळी साजरी करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. सध्या कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित आढळत आहेत ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकानं नियमांचे पालन केलं पाहिजे. प्रशासन प्रयत्न करतंय, त्यामध्ये जनतेनेही मनावर घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी केली.
महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही मीठाचा खडा टाकू नये
हे तीन पक्षांचं सरकार असून कुणाला मंत्री करायचं हा तीन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना अडचणीत आणणारी वक्तव्य करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळं महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
शरद पवारांनी चर्चा करुन सर्वांना जबाबदारी दिली, नवाब मलिकांचे वक्तव्यhttps://t.co/utYk6kDqWl #NawabMalik #AnilDeshmukh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2021
संबंधित बातम्या
दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन
25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या, राज्य मोदी सरकारकडे मागणी करणार
(Ajit Pawar said government will take action those responsible for suicide of Deepali Chavan)