Ajit Pawar : जेव्हा अजित पवार म्हणतात देऊ का कानाखाली?, तर टॅटूबद्दल विचारतात मैत्रिणीचं नाव आहे का?

दादांच्या नजरेत कर्मचाऱ्याच्या हातावरचा टॅटू पडला, हा टॅटू दिसताच दादांनी या कर्मचाऱ्याचा हात हातात पकडला आणि वाचरलं, आर कोणाचं नावं आहे मैत्रीणीचं का ? तेव्हा तो कर्मचारी काय माहित कोणाचं आहे असं म्हणताचं सगळे हसायला लागले.

Ajit Pawar : जेव्हा अजित पवार म्हणतात देऊ का कानाखाली?, तर टॅटूबद्दल विचारतात मैत्रिणीचं नाव आहे का?
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 6:26 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहे एक धडाकेबाज राजकारणी तर आहेतच, मात्र त्याचबरोबर अजित पवारांचे विनोदी वृत्तीही तेवढीच (Ajit Pawar Comedy) गाजते. काल पर्वाचं पुण्यातले अजित पवारांचे पोलीस अधिकाऱ्याला बारीक व्हा बोलण्यापासून ते आता चुकणार नाही बाबा…बोलण्यापर्यंत किस्से सोशल मीडियावर धुमाकूळ (Ajit Pawar Video) घालत होते. आज पुण्यात पुन्हा अजित पवार अशाच मूडमध्ये दिसून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव पव्हेलियनचं उद्घाटन  उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालं. तेव्हा दादा जिमच्या विभागात गेले आणि यावेळी ट्रेनरची पंचाईत होताना दिसून आली. कारण दादानी विचारलं याचं नियोजन कसं केलंय, किती लोक एकावेळी व्यायाम करू शकतात, तेव्हा कर्मचारी म्हणाला 16, मग काय दादांनी थेट सगळं सामानचं मोजून टाकलं, मात्र आकडा जेव्हा 10 होता तेव्हा कर्मचारी 12 म्हणाला, मग  दादांनी त्याला ठणकावलं आणि म्हणाले की 10 चं आहे आणि तुम्ही म्हणला 16…मग प्रेमानं दादा म्हणाले देऊ का कानाखाली? हे ऐकताच उपस्थितांमध्य हशा पिकला.

टॅटूवरूनही हास्यकल्लोळ

हा हस्यकल्लोळ येवढ्यावच थांबला नाही, दादा नंतर कार्डीयाक रुममध्ये गेले तेव्हा विचारलं यातलं चांगलं काय? त्यावेळी माहिती देत असताना दादांच्या नजरेत कर्मचाऱ्याच्या हातावरचा टॅटू पडला, हा टॅटू दिसताच दादांनी या कर्मचाऱ्याचा हात हातात पकडला आणि वाचरलं, आर कोणाचं नावं आहे मैत्रीणीचं का ? तेव्हा तो कर्मचारी काय माहित कोणाचं आहे असं म्हणताचं सगळे हसायला लागले, दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हाहात बंदूक घेऊन निशाणाही लावला तर फुटबॉलच्या मैदानावर किकही मारल्या.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात काय घडलं?

हे फक्त आजच नाही घडलं तर दोन दिवसांपूर्वी दादा विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात होते. तेव्हा ते एका पोलीस कर्मचाऱ्याला स्टेजवरच बारीक व्हा…बारीक…असे म्हणताना दिसून आले. त्यानंतर नाशिकमधील साधू, महंतांच्या झगड्यावरून हनुमान हे पाहून कपाळात हात मारत असेल म्हणत त्यांंनी त्यांचीही फिरकी घेतली. तर एका कार्यक्रमात बोलताना त्यांना थेट दहा वर्षांपूर्वीच धरणाबाबत केलेलं चुकीचं वक्तव्यचं आठवलं…मग आजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले तुम्ही कितीही टाळ्या वाजवा पण मी पुन्हा नाही चुकणार…त्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. राजकीय खाड्यात आपण राजकीय आरोप प्रत्यारोप तर रोज पाहत असतो, मात्र अजित पवारांच्या या विनोदी वृत्तीमुळे राजकारणही कधी कधी थोडं लाईट मोडवर येतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.