चंद्रकांत पाटील फार मोठी व्यक्ती, त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं बोलणं बरोबर नाही : अजित पवार
चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार, 10 मार्चला सरकार जाणार चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 10 मार्चनंतर जाणार असल्याच्या वक्त्यावर प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार, 10 मार्चला सरकार जाणार चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि बजाज समुहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळं भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह निघून गेल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केलीय.
चंद्रकांत पाटील मोठी व्यक्ती
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मोठी व्यक्ती आहे. मी लहान कार्यकर्ता असून त्यांच्यावर काय बोलणार, अशा शब्दात अजित पवार यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यातील निवडणुका संपल्यावर राज्यातील सरकार पडेल, असा दावा केला होता. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
पाहा व्हिडीओ
समाजातील गरीब घटाकांना न्याय देण्याचा प्रयत्न
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पावर आमचं काम सुरू आहे. मात्र, समाजातल्या गरीब घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं अजित पवार म्हणाले.विधानसभेतील 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात राज्य सरकारचा काही संबध नाही, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, त्याचं पालन करावं लागतंय,असंही अजित पवार म्हणाले.
शिवसेना मंत्र्यांच्या निधीवरून त्यांचं काय मत असेल त्यावर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आम्ही एकत्र बसून चर्चा करू,आणि त्यावर मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. काही समज, गैरसमज झाले असतील तर दूर करू प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राहुल बजाज हे उद्योग समूहाचे पितामह होते, यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय. राहुल बजाज यांचा स्वभाव स्पष्टवक्ता असा होता. उद्योग करत असताना सामाजिक क्षेत्रासाठी काय करता येईल हा विचार त्यांच्या मनात होता. स्कुटरनंतर बाईकमध्ये आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी बाईक निर्माण केल्या. बजाजनं जे प्रोडक्ट आणलं ते जगात लोकप्रिय झालं. ते उद्योग क्षेत्रात असले तरी त्यांनी समाजातील महत्त्वाच्या गोष्टींवर मत व्यक्त केलं. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :
IPL Players Auction 2022 LIVE : लिलावाचा दुसरा दिवस फलंदाजांचा, परदेशी खेळाडूंसाठी बिडींग वॉर होणार
Ajit Pawar take jibe of Chandrakant Patil statement on MVA Government Collapse