पिंपरी – पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)मधील पहिली ते बारावी शाळा(School) ,कॉलेज 1 फेब्रुवारी पासून होणार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिली ते आठवी पर्यंत अर्ध सत्रात आणि नववी ते बारावीचे वर्ग नियमित स्वरूपात सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. शाळा,कॉलेज मधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं गरजेचं तर ज्याचे लसीकरण(vaccine) नसले झाले त्यांना 48 तासापूर्वीचा RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना शाळा, कॉलेज परिसर निर्जंतुकीकरणं करणे, कोविड संदर्भातील नियम दर्शनी भागावर लावणे देखील गरजेचं असणार आहे.
कोरोनाचा आढावा घेऊन शाळा सुरु
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आलया नव्हत्या. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या कोरोना आढावा बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शाळांमध्येच लसीकरण मोहीम राबवणार
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केले जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 86 टक्के 15 ते 18 वयोगटातील व्हॅक्सीन झालं. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झाल्याचे समोर आले आहे. पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.
सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली, डांस विथ मी गाणं झालं रिलीज; गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला
Raosaheb Danve | ‘आज वाईन विकायला लागेलत, उद्या बियर विकतील’, रावसाहेब दानवेनाचा सरकारला टोला