Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Dave : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सोयरिकी अन् नातेवाईक जाहीर करावे, चेतन कांबळेंच्या बॅनरवरून आनंद दवे संतापले

माजी नगरसेवक चेतन कांबळे (Chetan Kamble) यांनी जाहिरातबाजी करून शेंडी जानव्याचा उल्लेख केला असून ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे. हा निर्बुद्धपणा असल्याची टीका आनंद दवे यांनी केली आहे. यामुळे शिवसेनेचीच बदनामी होत असल्याचे आनंद दवे यांनी म्हटले आहे.

Anand Dave : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सोयरिकी अन् नातेवाईक जाहीर करावे, चेतन कांबळेंच्या बॅनरवरून आनंद दवे संतापले
शेंडी-जानव्याच्या उल्लेखावरून आनंद दवेंची उद्धव ठाकरेंवर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 10:33 AM

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या सोयरिकी आणि नातेवाईक जाहीर करावेत, म्हणजे शिवसैनिक शेंडी जानव्याचा उल्लेख बंद करतील, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. औरंगाबादेतल्या बॅनरवर एकच नारा शेंडी जानव्याला हद्दपार करू, ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करू, असा आशय आहे. यावर ब्राह्मण तथआ हिंदू महासंघाने आक्षेप घेतला आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना सवालही विचारला आहे. माजी नगरसेवक चेतन कांबळे (Chetan Kamble) यांनी जाहिरातबाजी करून शेंडी जानव्याचा उल्लेख केला असून ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे. हा निर्बुद्धपणा असल्याची टीका आनंद दवे यांनी केली आहे. यामुळे शिवसेनेचीच बदनामी होत असल्याचे आनंद दवे यांनी म्हटले आहे.

बॅनरवर काय उल्लेख?

उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी त्यांच्या ट्विटरवर तसेच शहरात काही बॅनर लावले आहेत. त्यावर शेंडी जानवे तोडा, शिवसेना जोडा असा आशय आहे. त्यासोबतच ज्यादा द्याल ताण तर उलटा घुसेल बाण, असादेखील उल्लेख आहे. एकच नारा – शेंडी जानव्याला हद्दपार करू! ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करू, अशाप्रकारचे बॅनर लावून जाहिरातबाजी केली आहे. याच बॅनरवर आणखीही भला भोठा आशय छापण्यात आला आहे. चेतन कांबळे या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने ही जाहिरातबाजी केली असून यावर आता टीका होत आहे.

हे सुद्धा वाचा
chetan kamble

उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त माजी नगरसेवक चेतन कांबळेंनी केलेली जाहिरात

काय म्हणाले आनंद दवे?

चेतन कांबळे यांनी केलेली जाहिरातबाजी हा निर्बुद्धपणाचा कळस आहे. त्यांना शिवसेना माहीत आहे, ठाकरे परिवार माहीत आहे. ठाकरे परिवाराच्या सोयरिकी माहीत आहेत. ठाकरेंच्या घरात कुठल्या मुली आल्या आणि ठाकरेंच्या मुली कोणत्या घरी गेल्या याचा जरी अभ्यास केला, तरी अशी वक्तव्ये त्यांच्याकडून येणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनाही विनंती आहे, की भाषणामध्ये शेंडी-जानव्याचे हिंदुत्व हे वाक्प्रचार बंद करा. शिवसैनिक याचा चुकीचा अर्थ घेतात आणि समाजात स्वत:ची आणि शिवसेनेची बदनामी करत आहेत. यानिमित्ताने तरी उद्धव ठाकरे स्वत:ची वक्तृत्व शैली बदलतील अशी अपेक्षा करतो, असे आनंद दवे म्हणाले.

'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.