Anand Dave : ‘हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले’
हिंदुत्व हरले, मुस्लीम (Muslim) मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. राजसाहेब यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आणि आमची भीती खरी ठरली, असे आनंद दवे म्हणाले.
पुणे : हिंदुत्व हरले, मुस्लीम (Muslim) मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. माझे मतदार काम नाही धर्म पाहून मतदान करतात. त्या मतांची काळजी असल्याने भोंग्यासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावणार नाही, असे स्पष्ट सांगून आदेश धुडकवणारे वसंत मोरे पक्षातच राहणार, हे राज साहेबांनी स्पष्ट केले आहे. राजसाहेब यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आणि आमची भीती खरी ठरली, असे आनंद दवे म्हणाले. आता उद्याच्या सभेत दाखवला जाणारा आक्रमकपणा काय उपयोगाचा, असा सवालही त्यांनी केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये, अशी अपेक्षा आनंद दवे यांनी व्यक्त केली होती.
राज ठाकरेंच्या भूमिकेचे आधीही केले होते समर्थन
राज ठाकरेंच्या भोंग्याच्या वक्तव्यावरून आणि भूमिकेवरून आनंद दवे यांनी त्यांचे समर्थन केले होते. त्यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. आता या भूमिकेवरून त्यांनी हटू नये, असे ते म्हणाले होते. दोन गेले तर वीस येतील, पण भूमिका बदलू नये. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्त्वाचे आहे. हिंदुत्ववादी तुमच्याकडे आशेने पाहत आहे, असे ते म्हणाले होते.