तुमच्या घरात आलेल्या आणि तुमच्या घरातून गेलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या ते आठवा; आनंद दवे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

संभाजीनगर येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघातील हल्ला चढवला. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ठाकरे यांच्या या विधानाचा हिंदू महासंघाने निषेध नोंदवला आहे.

तुमच्या घरात आलेल्या आणि तुमच्या घरातून गेलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या ते आठवा; आनंद दवे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
anand daveImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 8:53 AM

पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संभाजीनगरच्या रॅलीतून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. यावेळी त्यांनी आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं न्सल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा हिंदू महासंघाने निषेध केला आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार एकाच जातीचा अपमान करत आहेत. तुम्ही आमच्या जातीला टार्गेट करू नका. तुमचा घरोबाच मुळात शेंडी जानव्याशी आहे, असा टोला लगावतानाच तुमच्या घरात आलेल्या मुली आणि तुमच्या घरातून गेलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या ते आठवा, अशा शब्दात हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आनंद दवे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. उद्धव साहेब तुम्ही हिंदू धर्मातील एका जातीचा वारंवार अपमान करत आहात. शेंडी जानवंवाल्यांबरोबरच तुमचा घरोबा आहे हे विसरू नका. माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही असं तुम्ही वारंवार म्हणत आहात. प्रत्येकवेळेस हे वाक्य वापरता. या विधानाचा आम्ही निषेध करतो. पण हा निषेध करत असतानाच तुम्ही सुद्धा त्याच कुळातील आहात हे सुद्धा स्पष्ट करतो, असा टोला आनंद दवे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

हेच दुर्देव आहे

ठाकरे घरात आलेल्या मुली आणि ठाकरेंनी दिलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या आहेत हे जरा आठवा. स्वतःच्या सोयरीक जाहीर करा. आत्यांची आडनावे सांगा. सूनांची, व्याहांची नावे सांगा, असं आव्हान देतानाच हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला स्वतःला सांगावं लागत आहे, सिद्ध करावे लागत आहे. हेच दुर्दैव आहे. ते करत असतानाच तुम्ही एका जातीला वारंवार बदनाम करण्याच पापपण करत आहात, अशी टीकाही दवे यांनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

सावरकर गौरव यात्रा जरुर काढा आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेनाभवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढवी लागते. मालेगावात सभा झाली. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप. मला एक उदाहरण द्या मी पुन्हा तोंड दाखवणार नाही. मी काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले? असा सवाल करतानाच आमचं हिंदुत्व हे तुमच्यासारखं नाही. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

आता भाजपच्या व्यासपीठावर सगळे संधी साधू. तुमचे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. लोकशाही संपवायची इतरांना ठेवायचे, तुरूंगात टाकायचे. अखंड हिंदुस्थान व्हावा हे सावरकरांचे स्वप्न होते. अखंड हिंदुस्थान करण्याची भाजपची हिंमत आहे काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी कालच्या संभाजीनगरातील सभेतून केला होता.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.