प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणेकर अनिकेत साठे लष्करात लेफ्टनंटपदी, वाचा प्रेरणादायी कहाणी

'यूँ ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं', हे वाक्य खरं करुन दाखवलंय पुण्याच्या अनिकेत साठे याने... 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणेकर अनिकेत साठे लष्करात लेफ्टनंटपदी, वाचा प्रेरणादायी कहाणी
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 2:11 PM

पुणे : ‘यूँ ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं’, हे वाक्य खरं करुन दाखवलंय पुण्याच्या अनिकेत साठे याने…  नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. (Aniket Sathe from Pune as a Lieutenant officer in the Army)

अनिकेतच्या लेफ्टनंट पदावरील नियुक्तीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळवलं आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांचे वडिल अमरेंद्र साठे यांचे निधन झाले होते. तरीही ते खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी लेफ्टनंट पदापर्यंत वाटचाल करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अनिकेत साठे हे कोथरुडचे रहिवासी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फार मोठी मजल मारली आहे. त्यांचे शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले आहे. डिसेंम्बर 2016 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी( NDA)च्या 137 व्या तुकडीसाठी अनिकेत साठे यांची निवड झाली होती.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतील तीन वर्षे आणि इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथील एक वर्षाचे प्रशिक्षण अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करुन आज त्याने लेफ्टनंटपद मिळवले आहे. अनिकेतच्या यशाबद्दल पुण्यातील विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

(Aniket Sathe from Pune as a Lieutenant officer in the Army)

संबंधित बातमी

मित्रांचा नादच खुळा! जिवलग मित्राला नोकरी लागली, पगाराची रक्कम लिहून चौकात अभिनंदनाचा फलक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.