शिवसेना भवनासमोर राडा; अनिल परब म्हणतात, भाजपला उत्तर देऊ
शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिवसेना भवनावर चाल करून आल्यावर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. (Shiv sena-BJP)
पुणे: शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिवसेना भवनावर चाल करून आल्यावर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही भाजपला उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. (Anil Parab warns bjp over agitation at shivsena bhavan in mumbai)
अनिल परब आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला हा इशारा दिला. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला. त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असं परब म्हणाले.
शिवसेनाचा वर्धापन दिन साधेपणाने
उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबाबत सस्पेन्स आहे. त्यावरही परब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना भवनासमोर राडा झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला गुंडा पार्टी म्हणून संबोधले होते. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.
अजित पवार म्हणाले…
राऊत यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत, असं पवार म्हणाले. (Anil Parab warns bjp over agitation at shivsena bhavan in mumbai)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 June 2021 https://t.co/hOpnnBvaCK #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2021
संबंधित बातम्या:
संजय राऊत म्हणाले, शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी, अजितदादा म्हणतात….
‘होय… शिवसेना गुंडगिरी करते, शिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा
VIDEO: शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार
(Anil Parab warns bjp over agitation at shivsena bhavan in mumbai)