Pune crime| आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक म्होरक्या पुणे पोलिसांच्या ताब्यात
आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवेत आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे. अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
पुणे – आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात (Health Recruitment Paper scam ) सहभाग असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे पुणे पोलिसांचे काम सुरूच आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना अटक केल्यानंतर आता आणखी एका म्होरक्याला पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber police )अटक केले आहे. अतुल प्रभाकर राख (Atul Prabhakar rakh) (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल हा टकेतील आरोपी संजय सानपाचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होही अशी आशा पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना यांची मदत होणार आहे.
पुण्यातुनच पोलीसांनी जेरबंद केल
आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवेत आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे. अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. अतुल राख याला ताब्यात घेतलं आज कोर्टात हजर करणार आहेत.
आरोपींवर लाचलुचपतचं कलम लागणार
पुणे पोलिसांनी नुकतंच टीईटी 2019 च्या परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमं लावण्यात येणार आहेत.
Oral Cancer : ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग
Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही ‘राजा’चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर