पुणे- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ( म्हाडा) मधील तब्बल 4 हजार 222 घरांसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घरांच्या खरेदीसाठी नागारिकांना चांगली संधी आहे. म्हाडाअंतर्गत पुणे आणि पिपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 823 सदनिका असणार आहे. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सदनिकांसाठी अर्ज करताना म्हाडाच्या योजनेपासून शहरातील मोक्याचे ठिकाण, शाळा , बसस्थानके, बाजारपेठा यासारख्या अनेक गोष्टींची चिंता आता मिटणार आहे.
मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर
सर्वसामान्यपणे घराची खरेदी करताना मूलभूत सोयीसुविधां किती चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत, हे बघितले जाते. याबरोबरच घरापासून कामाचे ठिकाण व त्यासाठी आवश्यक असणारी कनेक्टिव्हीटी याचा विचार केला जातो. म्हाडाच्या या लॉटरीतील सदनिकांसाठी अर्ज करताना कनेक्टीव्हीटी विचार नक्की करा.
पुणे प्रकल्प
आंबेगाव बुद्रुक ते स्वारगेट – 7.9 किमी, आंबेगाव बुद्रुक ते शिवाजीनगर – 11.6 किमी, आंबेगाव बुद्रुक ते डेक्कन – 10.8 किमी.
येवलेवाडी ते स्वारगेट – 9.9 किमी, येवलेवाडी ते शिवाजीनगर- 11. 9 किमी, येवलेवाडी ते डेक्कन- 13.0 किमी.
मोहम्मदवाडी ते स्वारगेट -8.4 किमी, मोहम्मदवाडी ते शिवाजीनगर – 11. 9 किमी, मोहम्मदवाडी ते डेक्कन – 11.5 किमी.
कोथरूड ते स्वारगेट – 7.0 किमी, कोथरूड ते शिवाजीनगर – 7.9 किमी, कोथरूड ते डेक्कन- 4.3 किमी.
धानोरी ते स्वारगेट -14.3 किमी, धानोरी ते शिवाजीनगर -11.8 किमी, धानोरी ते डेक्कन- 13.4 किमी.
लोहगाव ते स्वारगेट -11.2 किमी, लोहगाव ते शिवाजीनगर -14.7 किमी, लोहगाव ते डेक्कन -15.4 किमी.
वाघोली ते स्वारगेट -20.3 किमी, वाघोली ते शिवाजीनगर -18.6 किमी, वाघोली ते डेक्कन -20.2 किमी.
फुरसुंगी ते स्वारगेट -13.9 किमी, फुरसुंगी ते शिवाजीनगर -17.5 किमी, फुरसुंगी ते डेक्कन -17.0 किमी.
खराडी ते स्वारगेट – 14.7 किमी, खराडी ते शिवाजीनगर -14.5 किमी, खराडी ते डेक्कन- 15.5 किमी.
घोरपडी ते स्वारगेट – 7.0 किमी, घोरपडी ते शिवाजीनगर -8.3 किमी, घोरपडी ते डेक्कन -9.0 किमी.
याबरोबर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रकल्पामधील अंतर
दिघी ते स्वारगेट -16.4 किमी, दिघी ते शिवाजीनगर- 13.3 किमी, दिघी ते डेक्कन -15.0 किमी, दिघी ते वल्लभनगर – 9.6 किमी.
चऱ्होली ते स्वारगेट -24.4 किमी, चऱ्होली ते शिवाजीनगर – 20.2 किमी, चऱ्होली ते डेक्कन -21.9 किमी, चऱ्होली ते वल्लभनगर -13.8 किमी.
चिखली ते स्वारगेट -25.3 किमी, चिखली ते शिवाजीनगर- 21.3 किमी, चिखली ते डेक्कन -22.5 किमी, चिखली ते वल्लभनगर – 8.6 किमी.
किवळे ते स्वारगेट – 25.2 किमी, किवळे ते शिवाजीनगर – 22.6 किमी, किवळे ते डेक्कन -22.7 किमी, किवळे ते वल्लभनगर -17.6 किमी.
मोशी ते स्वारगेट – 25.2 किमी, मोशी ते शिवाजीनगर – 22.7 किमी, मोशी ते डेक्कन- 23.8 किमी, मोशी ते वल्लभनगर -9.6 – किमी.
पुनावळे ते स्वारगेट -22.4 किमी, पुनावळे ते शिवाजीनगर -19.8 किमी, पुनावळे ते डेक्कन -19.9 किमी, पुनावळे ते वल्लभनगर- 15.0 किमी.
वाकड ते स्वारगेट-17.7 किमी, वाकड ते शिवाजीनगर -15.1 किमी, वाकड ते डेक्कन – 15.2 – किमी, वाकड ते वल्लभनगर – 9.8 किमी.
चाकण ते स्वारगेट 35.4 किमी, चाकण ते शिवाजीनगर – 32.8 किमी, चाकण ते डेक्कन – 33.6 किमी, चाकण ते वल्लभनगर – 20.7 किमी.
पिंपरी ते स्वारगेट – 17.9 किमी , पिंपरी ते शिवाजीनगर- 15.4 किमी, पिंपरी ते डेक्कन- 16.5 किमी, पिंपरी ते वल्लभनगर – 3.3 किमी.
रावेत ते स्वारगेट- 23.9 किमी, रावेत ते शिवाजीनगर – 21.3 किमी, रावेत ते डेक्कन- 21.4 किमी, रावेत ते वल्लभनगर- 17.7 किमी.
वाघिरे ते स्वारगेट- 16.9 किमी, वाघिरे ते शिवाजीनगर – 14.4 किमी, वाघिरे ते डेक्कन किमी -14.8 किमी, वाघिरे ते वल्लभनगर – 4.1 किमी.
बोऱ्हाडेवाडी ते स्वारगेट 24.1 किमी, बोऱ्हाडेवाडी ते शिवाजीनगर 21.5 किमी, बोऱ्हाडेवाडी ते डेक्कन 22.6 किमी, बोऱ्हाडेवाडी ते वल्लभनगर 7.7 किमी .
ताथवडे ते स्वारगेट 20.4 किमी, ताथवडे ते शिवाजीनगर 17.8 किमी, ताथवडे ते डेक्कन 17.9 किमी, ताथवडे ते वल्लभनगर 11.8 किमी.
चोविसागाव ते स्वारगेट 23.5 किमी, चोविसागाव ते शिवाजीनगर 19.4 किमी, चोविसागाव ते डेक्कन 21.0 किमी, चोविसागाव ते वल्लभनगर 11.4 किमी.
थेरगाव ते स्वारगेट 17.0 किमी, थेरगाव ते शिवाजीनगर 14.5 किमी, थेरगाव ते डेक्कन – 14.5 किमी, थेरगाव ते वल्लभनगर 8.6 किमी
डुडुळगाव ते स्वारगेट- 25.6 किमी, डुडुळगाव ते शिवाजीनगर – 21.6 किमी, डुडुळगाव ते डेक्कन 23.0 किमी, डुडुळगाव ते वल्लभनगर 21.6 किमी. (वरील अंतरमोजण्यासाठी गुगलमॅपचा आधार घेण्यात आला आहे)
संबंधित बातम्या:
पुणेकरांसाठी खुशखबर ! म्हाडाच्या 2 हजार 823 सदनिकांच्या नोंदणीस आजपासून सुरुवात
पुण्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी; आठवडाभर ढगाळ वातावरणाचा अंदाज