भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती, फक्त 10 वी पासची अट

भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणं गरजेचं आहे.

भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती, फक्त 10 वी पासची अट
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 11:09 AM

पुणे: पुण्यात महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं ही भरती केली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. (Army recruitment process will be implemented for women in Pune)

भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण महिला अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरुनच अर्ज सबमिट करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

कशी असेल भरती प्रक्रिया?

ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झालं आहे. अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचं आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरले असतील त्यांची संपूर्ण तपासणी करुनच भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारिरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना लष्करी पोलिस दलात दाखल करुन घेतलं जाणार आहे.

पोलीस भरतीबाबत जीआर जारी

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

UGC | विद्यापीठ परीक्षांबाबत यूजीसीचे नवे निर्देश; उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणतात…

Army recruitment process will be implemented for women in Pune

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.