मी तुमच्या चरणावर 1 लाख 1 रुपये अर्पण करते, शतकवीर बाबासाहेबांप्रती आशा भोसलेंची कृतज्ञता
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आशा भोसले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी 1 लाख 1 रुपये अर्पण करत बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सर्वत्र कोरोना संसर्गाची दाहकता वाढली आहे. या काळात तब्बल दीड वर्षानंतर मी घराबाहेर पडले आहे. ही कोरोनाची काळ कोठडी आहे. मी आता लोणावळ्यात राहतेय, मुंबईमध्ये नाही. लवकरच परत मुंबईला जाणार आहे, असं त्या म्हणाल्या. मी भाषण देणारी बाई नाही, आता जी माणसं भाषण देऊन गेली, ती भाषणातील थोर माणसं आहेत. सगळीकडे उभं राहून ते भाषण देऊ शकतात, असं त्या म्हणाल्या. मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, तुमच्या चरणावर 1 लाख एक रुपये अर्पण करते, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पाहा काय म्हणाल्या आशा भोसले…
राज ठाकरेंकडून आशा भोसलेंचे कौतुक!
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदेर हे 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याच निमित्ताने पुण्यात खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खुद्द बाबासाहेब पुरंदरे, राज ठाकरे, आशा भोसले, आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलास भाषण करताना आशा भोसले यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे उत्तुंग पैलू सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत…. या वयातही काय दिसतात ना… अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु होती… मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसलेत… आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे…याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणाची गमतीदार सुरुवात
जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी राज ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता लोकांच्या अंगवळणी पडलीय. मात्र आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची नवी सुरुवात केली. अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, असं म्हणत राज ठाकरे यांनी आजच्या कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं.
हेही वाचा :
Video : ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना!’, राज ठाकरेंकडून सौंदर्याचं कौतुक
PHOTO : डोक्यावर पगडी, खांद्यावर भरजरी शाल, शतकवीर बाबासाहेबांच्या सोहळ्यात राज ठाकरे, आशिष शेलार