‘आज नवा सूर्य उगवतोय तो माझ्या आईच्या रुपात’, अश्विनी जगताप यांच्या लेकीची भावनिक प्रतिक्रिया

"पप्पांना जाऊन पंधराच दिवस झाले होते. त्यानंतर लगेच ही पोटनिवडणूक लागली. जिथे-जिथे जाईल त्या घरी अश्रूच होते. मी त्यांचीही समजूत काढायची. तुम्ही नाही सावरलं तर आम्ही कसं सावरणार?", अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या जगताप यांनी दिली.

'आज नवा सूर्य उगवतोय तो माझ्या आईच्या रुपात', अश्विनी जगताप यांच्या लेकीची भावनिक प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 7:58 PM

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल (Chinchwad by-election result) आज समोर आला. या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झाला. या विजयानंतर जगताप कुटुंबियांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली. यावेळी संपूर्ण जगताप कुटुंब, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते भावुक झाले. एकीकडे लक्ष्मण जगताप आपल्यात नसल्याचं दु:ख डोळ्यांमध्ये होतं. तर दुसरीकडे विजयाचा आनंद होता. त्यामुळे अतिशय भावनिक वातावरण होतं. यावेळी अश्विनी जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या जगताप यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. ‘आज नवा सूर्य उगवतोय तो माझ्या आईच्या रुपात’, असं ऐश्वर्या यावेळी म्हणाल्या.

“पप्पांनी केलेल्या कामांची ही पावती आहे. त्यांनी खरंच काम केलेलं आहे म्हणूनच लोकांनी हा कौल आमच्या घरातच दिलाय. भारतीय जनता पार्टीला कौल दिलेला आहे. मी मतदानाच्या दिवशीसुद्धा म्हटलं होतं की, आमचा सूर्य 3 तारखेलाच मावळलेला आहे. पण अख्खं पिंपरी चिंचवड, सगळे कार्यकर्ते, तसेच आमचा सर्व परिवार, आज नवा सूर्य उगवतोय तो माझ्या आईच्या रुपात”, असं ऐश्वर्या म्हणाल्या.

‘पप्पांना जाऊन पंधराच दिवस झाले होते आणि…’

“अनुभव खूप आला. पप्पांना जाऊन पंधराच दिवस झाले होते. त्यानंतर लगेच ही पोटनिवडणूक लागली. जिथे-जिथे जाईल त्या घरी अश्रूच होते. मी त्यांचीही समजूत काढायची. तुम्ही नाही सावरलं तर आम्ही कसं सावरणार? लोकांचं फक्त आणि फक्त भरभरुन प्रेम आहे. बाकी काही नाही”, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या जगताप यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“राजकीय गणित असं काही नव्हतं. त्यांनी केलेल्या कामांवर विश्वास होता. त्यांची कामे पुढे न्यायची आहेत हा लोकांवर आमचा विश्वास होता. वडिलांची आठवण क्षणोक्षणी राहणारच. पण कधी वडील गेले की आपली आई हीच दोन्ही पारडं सांभाळते. ते कधी वडीलही होते आणि आईचीदेखील भूमिका पार पाडते. ती आता ही धुरा सांभाळेल. पप्पांची स्वप्न पूर्ण करावीत हेच ध्येय आहेत”, असं ऐश्वर्या म्हणाल्या.

…आणि अश्विनी यांना रडू कोसळलं

चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला. त्यानंतर त्या दिवंगत आमदार आणि आपले पती लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी पाहोचल्या. लक्ष्मण यांच्या स्मृतीस्थळी नमस्कार करत असताना अश्विनी यांचा संयमाचा बांध सुटला आणि त्या अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या. अश्विनी यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी देखील ओक्शाबोक्शी रडू लागली.

यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हा क्षण पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. विशेष म्हणजे स्मृतीस्थळावर जमलेल्या पत्रकारांच्या देखील डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यामुळे काही काळासाठी तिथलं वातावरण अतिशय भावूक बनलं. अश्विनी यांचा त्यांच्या पतीच्या स्मृतीस्थळावरील भेटीचा व्हिडीओ समोर आलाय. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही डोळ्यांमधून पाणी येईल, असाच तो व्हिडीओ आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.