किरीट सोमयांना किलीट तोमय्या म्हणण्यावरून ‘सामना’! असीम सरोदे म्हणतात, हा तर…
सामनातून किरीट सोमय्या यांना किलीट तोमय्या म्हणत खिल्ली उडवली आहे. तसेच त्यांना धडा शिवण्याचीही भाषा करण्यात आली आहे. त्यावर सामना या मुखपत्राने अत्यंत बेजबाबदार आणि चुकीची भाषा वापरलीय. किरीट सोमय्या यांच्या तोत्र्या बोलण्यावर आधारित ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, असा घणाघात असीम सरोदे यांनी केला आहे.
पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ते राऊतांविरोधात (Sanjay Raut) गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार होते. तत्पूर्वी महापालिका परिसरात काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच त्यांना रोखण्याचा, अंगावर धावून जाण्याचा प्रकरण करण्यात आला. त्यानंतर सामनातूनही (Samna) सोमय्यांची खिल्ली उडवत टीका करण्यात आाली. हेच प्रकरण आता आणखी पेटलं आहे. कारण किरीट सोमय्यांबाबत सामनाने जी भाष वापरली आहे ती आक्षेपार्ह आहे, हा तर अपंगांचा अपमान आहे असा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. शिवसेनेवर टीका करण्यात सोमय्या नेहमीच पुढे असतात. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले आहेत. शिवसेना नेतेही त्याला वेळोवेळी उत्तर देतात मात्र पुण्यातल्या प्रकरणानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येतेय.
अॅड. असीम सरोदे काय म्हणाले?
सामनातून किरीट सोमय्या यांना किलीट तोमय्या म्हणत खिल्ली उडवली आहे. तसेच त्यांना धडा शिवण्याचीही भाषा करण्यात आली आहे. त्यावर सामना या मुखपत्राने अत्यंत बेजबाबदार आणि चुकीची भाषा वापरलीय. किरीट सोमय्या यांच्या तोत्र्या बोलण्यावर आधारित ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, असा घणाघात असीम सरोदे यांनी केला आहे. तसेच अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांचा अपमान करणारा अमानवीय दर्जा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर यावर महाराष्ट्राच्या अपंग विभाग आयुक्तांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेऊन नोटीस जारी करावी अशी मागणी सरोदे यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद आता वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.
असीम सरोदे यांचं ट्विट
सामना या मुखपत्राने अत्यंत चुकीची, अमानुष भाषा वापरली आहे. किरीट सोमय्या यांच्या तोत्र्या बोलण्यावर आधारित ही भाषा अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांचा अपमान आहे. त्यामुळे यातील अमानवीय दर्जा लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या अपंग विभाग आयुक्तांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेऊन नोटीस जारी करावी pic.twitter.com/BG5jDYxTFx
— Asim Sarode (@AsimSarode) February 6, 2022
पुणे महापालिका परिसरात नेमकं काय घडलं?
पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर, महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे.