पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) जिलेटिन कांड्यांचा वापर करून एटीएम फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बँकेचे एटीएम (Canara bank) जिलेटिनच्या कांड्या लावून उडवण्यात आले आहे. यात लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एटीएम (ATM) लुटण्याचा उद्देशाने हा ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात किती नोटा जळून खाक झाल्या, याची माहिती बँक अधिकारी आल्यानंतरच मिळणार आहे. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे चोरट्यांना रोकड लुटता आलेली नाही. दोन अज्ञात चोरट्यांनी या धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. कारण त्यांना रोकड लुटताच आली नाही. घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला, आता पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
एटीएम मशीनजवळ जिलेटिन कांड्या या चोरट्यांनी ठेवल्या. तर पंचवीस मीटर अंतरावर वायर टाकली आणि कशाच्या तरी साह्याने करंट पास करून हा ब्लास्ट घडविण्यात आला. मात्र या ब्लास्टमुळे मशीनच्या वरील पत्रा केवळ बाजूला झाला. रोकडच्या वर असलेला जाड पत्रा मात्र तसाच राहिला आहे. त्यामुळे चोरट्यांचा रोकड लुटण्याचा डाव फसला आहे. कारण याआधीही अशाप्रकारे रोकड लुटण्याचे प्रकार घडले आहेत. विशेषत: पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे ब्लास्ट करून एटीएममधील रोकड लुटण्यात आलेली आहे. आता याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
#Pune : पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील कॅनरा बँकेचं एटीएम जिलेटिनच्या कांड्या लावून उडवण्यात आलंय. यात लाखोंच्या नोटा खाक झाल्याची शक्यता आहे.#pimprichinchwad #Police #ATM #gelatinsticks
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/a2LUqXUzvN— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2022