Pune crime : कारचालकाच्या तोंडावरच फेकून मारली बिअरची बाटली! वाहनं एकमेकांना धडकल्याच्या रागातून पुण्यातल्या रिक्षाचालकाचा प्रताप

राठोड, त्यांची आई, भाऊ आणि बहीण कारमधून इस्कॉन मंदिरापासून लुल्लानगरमार्गे गंगाधाम चौकाकडे एका लोकप्रिय भोजनालयाकडे जात असताना, त्याच दिशेने ऑटोरिक्षाने धडक दिली. यावेळी राठोड आणि ऑटो चालक यांच्यात वाद झाला.

Pune crime : कारचालकाच्या तोंडावरच फेकून मारली बिअरची बाटली! वाहनं एकमेकांना धडकल्याच्या रागातून पुण्यातल्या रिक्षाचालकाचा प्रताप
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 9:25 PM

पुणे : वाहने एकमेकांना धडकल्याच्या रागातून रिक्षाचालकाने एका कारचालकाच्या गाडीवर बिअरच्या बाटलीने हल्ला (Beer bottle attack) केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत कारचालकाच्या डाव्या डोळ्याच्या खाली हाड फ्रॅक्चर झाले आणि ओठांना दुखापत झाली आहे. 11 जुलैरोजी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. गंगाधाम चौक ते लुल्लानगर चौक या रस्त्यावर पारसे कॉलनीजवळ वाहनाला धक्का लागला होता. त्यानंतर ऑटोरिक्षा चालकाने बिअरच्या बाटलीने हल्ला केला. त्यात कोंढवा बुद्रुक येथील रहिवाशाला दुखापत (Injured) झाली आहे. हर्षल भरत राठोड (30) या तरुणाला सदाशिव पेठेतील खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यानंतर तरुणाने गुरुवारी पोलिसांत तक्रार (Police complaint) दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 325 आणि 324 (धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), 504 (जाणूनबुजून अपमान करणे), 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 427 (दुर्घटना) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ऑटोरिक्षाने दिली धडक

वानवडी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी शुक्रवारी सांगितले, की राठोड, त्यांची आई, भाऊ आणि बहीण कारमधून इस्कॉन मंदिरापासून लुल्लानगरमार्गे गंगाधाम चौकाकडे एका लोकप्रिय भोजनालयाकडे जात असताना, त्याच दिशेने ऑटोरिक्षाने धडक दिली. यावेळी राठोड आणि ऑटो चालक यांच्यात वाद झाला. त्यानंतर ऑटोरिक्षा चालकाने बिअरची बाटली उचलली आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी हर्षल राठोड यांच्या चेहऱ्यावर मारली.

कारचे नुकसान

लगड म्हणाले, की पिरंगुट येथील ज्वेलरीच्या दुकानात सेल्समन राठोड यांनी आम्हाला ऑटोरिक्षाचा नोंदणी क्रमांक दिला आहे. आम्ही चालकाला लवकरात लवकर अटक करू. हर्षल यांचा भाऊ अक्षय याने सांगितले, की माझ्या भावाचा चेहरा या हल्ल्यात सुजला आहे. त्याच्या ओठांना टाके पडले आहेत. तो बोलण्याच्या स्थितीत नाही. ऑटो चालक आपले वाहन बेधडकपणे चालवत होता. त्याच्या वाहनाने आमच्या कारला धडक दिली. त्यात कारचे नुकसान. माझ्या भावाने ऑटोचालकाला नुकसान भरपाई देण्यास सांगितले असता त्याने वाद सुरू केला आणि शिवीगाळ केली. दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, असे अक्षयने सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘उपचार करणे गरजेचे होते’

अक्षय म्हणाला, की जेव्हा माझा भाऊ आमची कार रस्त्याच्या कडेला घेऊन गेला, तेव्हा ऑटोचालकाने तेथून बिअरची बाटली उचलली आणि माझ्या भावाच्या दिशेने भिरकावली. मी माझ्या भावाला रुग्णालयात नेले. कारण त्याच्यावर उपचार करणे आधी गरजेचे होते. त्याच्या एक्स-रे रिपोर्टमध्ये डोळ्याच्या खाली हाड फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले असल्याचे त्याने सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.