काँग्रेस आदानीच्या विरोधात, पण शरद पवारांचं काय?; बाबा आढावांचा महाविकास आघाडीला सवाल

Baba Adhav Hunger Strike : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे पुण्यात महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. यावेळी त्यांनी चकटफू योजनांवर तोंडसूख घेतले. तर काँग्रेस अदानी विरोधात आहेत. पण शरद पवारांचे काय? असा सवाल महाविकास आघाडीला केला.

काँग्रेस आदानीच्या विरोधात, पण शरद पवारांचं काय?; बाबा आढावांचा महाविकास आघाडीला सवाल
बाबा आढाव, शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 2:38 PM

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे पुण्यात महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. 95 व्या वर्षी त्यांनी चकटफू योजना आणि संधीसाधू राजकारणाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. त्यांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे. बाबा आढाव यांच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या वयात त्यांनी आंदोलन पुकारल्याने सरकारला, नेत्यांना त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

1952 सालापासून मी प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार असे बाबा आढावा म्हणाले. पण यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत पैशाचा धुडगूस घातल्याचा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजना सारख्या योजना निवडणुकीच्या तोंडावरच का आणल्या असा रोकडा सवाल त्यांनी केला. सरकाराने मतं मिळवण्यासाठी या तात्पुरता योजना आणल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांना पेन्शन देण्याची बाजू त्यांनी उचलून धरली. आपण आता स्वस्थ बसणार नाही, आता आत्मक्लेश आंदोलन केले. यापुढे आणखी काहीतरी करण्याचा इशारा त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस, शरद पवारांवर टीका

राज्यात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप होत असल्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. या आरोपात तथ्य असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी तांत्रिकदृष्ट्या आरोप सिद्ध करून दाखवावे, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाने महिन्याला तीन हजार रुपये जाहीर करणे हे अतिशय लांछनास्पद आहे, असे मत त्यांनी मांडले. काँग्रेस अदानींच्या विरोधात आहे. पण मग शरद पवारांचं काय? अदानीच्या पाठीशी उभी राहतात ही माणसं, असा रोकडा सवाल त्यांनी केला. त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या भूमिकांचा खरपूस समाचार घेतला.

सामूहिक सत्याग्रहाचा इशारा

ज्या काही योजना सुरु केल्या त्या योजना बंद करा आणि तरुण मुलांना रोजगार द्या, अशी मागणी त्यांनी केली. सरकार पक्षाचे चंद्रकांत पाटील मा‍झ्या अंगावरून गेले ते भेटायला आले नाहीत. रोहित पवार काल भेटायला आले होते तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली तुम्ही अदानींच्या गाडीत बसून फिरत होता. त्यांनी तो मुद्दा टाळला, असे ते म्हणाले.

आम जनतेने या आंदोलनाची दखल घ्यावी.माझं म्हणणं आहे घटनेचा राज्य निर्माण झालं पाहिजे. निकाल लागून एवढे दिवस झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होत नाही. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सामूहिक सत्याग्रह करणार, असा इशारा आढाव यांनी दिला.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.