भाजपची आणखी काही वतनं खालसा, बालभारतीत आता नव्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. या समित्या आणि अभ्यास गट भाजप सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते. दरम्यान त्याजागी नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवले आहे. (Balbharati Dismissed subject committees and study groups appointed During the tenure of Vinod Tawde)
राज्यातील भाजप सरकारच्या काळात विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना करण्यात आली होती. बालभारतीच्या प्रचलित पद्धतीत बदल करून अभ्यास मंडळ हे नाव बदलून विषय समिती आणि अभ्यास गट असे करण्यात आले. त्यावेळी नेमणुकांमध्ये भाजपसंबंधित सदस्यांची वर्णी लावण्यात आल्याची चर्चा होता. तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झालेले उद्बोधन वर्ग, पुनर्रचित अभ्यासक्रम यावरून वादही निर्माण झाले होते.
पुढील काही काळात अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित नव्या सदस्यांच्या नेमणुका केल्या जातील. त्यात सत्तेतील तीन पक्षांशी संबंधित व्यक्तींची नव्या विषय समित्या आणि अभ्यास गटांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत.
इतर बातम्या
चांगली बातमी! नव्या वर्षात ही कंपनी 9 हजार लोकांना नोकरी देणार; रोजगाराची सुवर्णसंधी
SBI Job : फक्त एक परीक्षा आणि मोठ्या पगाराची नोकरी, SBI मध्ये जॉबची सुवर्णसंधी
पुणे पालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकणार? वाचा बैठकीत काय घडलं?
(Balbharati Dismissed subject committees and study groups appointed During the tenure of Vinod Tawde)