2019 ला ‘ती’ गोष्ट कुणाच्या बापाला कळायची नाही; अजित पवारांची राजकीय खेळीचा तो भाग सांगितला
Ajit Pawar on Maharashtra Politics Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सध्या विविध भागात भेटी देत आहेत. पुण्यात आज अजित पवार आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांशी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. वाचा सविस्तर...
2019 ला राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडल्या. अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते सरकार कोसळलं. नंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. या सगळ्यादरम्यान काही गुप्त बैठका होत होत्या. या बैठकींचा अजित पवारांनी आजच्या भाषणात उल्लेख केला. 2014 देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सत्ता स्थापन केली. 2019 साली सत्तेत आमच्या साहेबानी सांगितलं शिवसेना असेल तर मी अजिबात येणार नाही. अमित शाह म्हणाले आम्ही शिवसेनेला सोबत घेणार आहोत. 2019 ला दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.
‘त्या’ शपथविधीवर भाष्य
अमित शाह म्हणाले आम्हाला जुना अनुभव चांगला नाही पण अजित तू शब्दाचा पक्का आहेस. मल्लिकार्जुन खरगे शरद पवारसाहेबांवर चिडले. विधानसभा अध्यक्ष वरून पुन्हा मिटिंग फिस्कटली आणि साहेब पुन्हा म्हणाले भाजपसोबत चर्चा करा. जयंत पाटील म्हणाले तुम्ही वर्षावर जा. पण दाराची फट उघडी ठेवा. पहाटे शपथविधी नाही नंतर सकाळी 8 वाजता शपथविधी झाला, असं अजित पवार म्हणाले.
पुलोद सरकार झाले. आम्ही 50 वर्षे साहेबाचे कायम स्वरूपी ऐकत आलोय.मी आलो की हलगी लावून पुढे फिरायचे आणि दुसरे आले की त्यांच्यापुढे फिरायचे परंतु एकाचे कुंकू लावा, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
त्या विधानाने वाटोळं झालं- अजित पवार
मी काय दिवसांपूर्वी धरणाबद्दल बोललो होतो. पण त्यामुळे माझं वाटोळं झालं ना राव… आता मी शब्द मी जपून वापरतो. काम करणाऱ्या लोकांकडून चुका होतात. कार्यकर्त्यांना सांगताना देखील काही जण म्हणतात अजित पवार दम देतायेत. माझ्या कार्यकर्त्यांना बोलतोय कुणाच्या पोटात का दुखावं? कुणी काही सांगेल आता आम्ही कामं करू. परंतु त्यांच्या काळात झाली नाही त्याचं काय?, असा सवाल अजित पवारांनी विचारला.
चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून ठेवलाय. पारदर्शक कारभाराला महत्व देण्याची गरज आहे. मी कधीही सत्तेचा माज येऊन दिला नाही. उद्याच्या 7 तारखेपर्यंत कळ काढा. कामगारांच्या बाबतीत मी स्वतः कंपनीत जाऊन कामगारांना का काढलं याबद्दल जाब विचारणार आहे, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे.